शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बाबांच्या प्रचाराला शह देण्यासाठी अजितदादांची सभा

By admin | Updated: April 7, 2016 00:02 IST

विविध राजकीय पक्षांकडून राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या मंत्री, आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांच्या प्रचारसभांचा, दौऱ्याचा आस्वाद लोणंदकरांना घेता येणार

मुराद पटेल -- शिरवळ -लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे, तशी राजकीय पक्षांकडून व उमेदवारांकडून प्रचाराचा धुरळा उडविण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात विविध राजकीय पक्षांकडून राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या मंत्री, आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांच्या प्रचारसभांचा, दौऱ्याचा आस्वाद लोणंदकरांना घेता येणार आहे.यामध्ये भाजपतर्फे राज्यपातळीवरील बड्या नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह उपाध्यक्ष अनुप शहा, जि. प. सदस्य दीपक पवार, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भरत पाटील, पुरुषोत्तम जाधव, अनुप सूर्यवंशी आदींच्या प्रचारसभा, कोपरासभा होणार आहेत. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व आमदार जयकुमार गोरे यांच्या सभांचा पाऊस होणार आहे. शिवसेनेकडून अद्यापही तळ्यात-मळ्यात सुरू असून, प्रचारसभांना कोण येणार, याबाबत स्पष्ट सांगण्यात येत नसले तरी पालकमंत्री विजय शिवतारे यांना प्रचारसभांसाठी आणण्याकरिता प्रयत्न सुरू आहे. स्थानिक पातळीवरील संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, उपजिल्हाप्रमुख विराज खराडे, राजेश कुंभारदरे, तालुकाप्रमुख संजय देशमुख प्रचाराची धुरा सांभाळणार. राष्ट्रवादीतर्फे आमदार मकरंद पाटील यांच्या व्यूहरचनेवर विश्वास ठेवून आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, नितीन भरगुडे-पाटील, राजेंद्र तांबे, रमेश धायगुडे, दत्तानाना ढमाळ यांच्यावर प्रचार मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारसभेचे नियोजनही राष्ट्रवादीकडून केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेनेकडून पक्षाच्या नेत्यांना प्रचारसभेत उतरवण्यात आल्याने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. अबब.. अर्धा डझन मंत्रीही येणार प्रचारात !यामध्ये प्रामुख्याने प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारसभेच्या माध्यमातून लोणंदकरांना सामोरे जाणार आहेत. तर अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्या सभा होणार आहेत. तर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सभा होणार आहेत.