शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार जिल्ह्यात तळ ठोकून

By admin | Updated: November 18, 2016 23:26 IST

निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

सातारा/कुडाळ : सांगली-सातारा विधान परिषदेसाठी शनिवारी मतदान होत आहे. मतदानापूर्वी रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी जिल्ह्यात तळ ठोकून होते. तसेच डॉ. पतंगराव कदम गटाचे प्रमुख कार्यकर्तेही जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे बांधण्यात दंग होते. सांगली-सातारा विधान परिषदेसाठी शनिवारी होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून शेखर गोरे निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीकडे आमदार अजित पवार यांनी वैयक्तिक लक्ष दिले आहे. त्यातच जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी अचानक मेढा येथे भेट दिली. ते राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात आल्याचे समजल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांच्याकडून पवार यांनी परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी वसंतराव मानकुमरे उपस्थित होते. उमेदवारांशी औपचारिक चर्चा केली. मेढ्यातील धावती भेट आटोपून अजित पवार महाबळेश्वरकडे रवाना झाले. त्यापूर्वीच जिल्'ातील पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकांचे सदस्य, राष्ट्रवादीचे सर्व आमदार व मुख्य पदाधिकारी महाबळेश्वरात दाखल झाले होते. महाबळेश्वरमध्ये गुप्त बैठक महाबळेश्वर : येथील एका हॉटेलमध्ये सातारा आणि सांगली जिल्'ांतील राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार व लोकप्रतिनिधींची अजित पवार यांनी गोपनीय बैठक घेतली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे आणि आ. सुमन आर. पाटील यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीत सांगली-सातारा विधान परिषद मतदानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची आहे. कोणाच्याही भूलथापांना तसेच आमिषाला राष्ट्रवादीच्या मतदारांनी बळी पडायचे नाही, परीक्षेच्या काळात राष्ट्रवादीला दगाफटका होईल, अशी वातावरण होऊ न देण्याचे आवाहन त्यांनी या बैठकीत केले.