शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"जुने मुद्दे काढणे ही फालतुगिरी"; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

By नितीन काळेल | Updated: April 9, 2023 18:19 IST

आता तर फडतूस, काडतूस म्हणायचे, हे काय चालले आहे राज्यात, असे सांगून पवार यांनी अदानींच्या मुद्द्यावरही भाष्य केले.

सातारा : ‘सध्या जुने मुद्दे काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. यामुळे बेरोजगारी, महागाई कमी होणार आहे का? आता त्यांच्याकडे महत्त्वाचे मुद्देच राहिले नाहीत, ही तर फालतुगिरी आहे,’ अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला, तर ट्वीटच्या मुद्द्यावर त्यांनी उत्तर द्यायला बांधिल आहे का, त्याने अंगाला भोके पडतात का? असा प्रश्नही उपस्थित केला.

सातारा जिल्हा दाैऱ्यावर रविवारी अजित पवार होते. साताऱ्यातील जिल्हा बॅंकेतील कार्यक्रमावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली. या कार्यक्रमाला आमदार मकरंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘महत्त्वाच्या व्यक्तीने काय वक्तव्य केले तर त्याबद्दल मत व्यक्त करावे लागते. कारण, मत व्यक्त केले नाही तर लोकांच्या मनात समज-गैरसमज निर्माण होतात. त्याबद्दल उत्तर द्यायला बांधिल आहे. पण, रोजच हाैसे, गवसे ट्वीट करणार. त्याच्या बातम्याही येणार म्हणून काय उत्तर द्यावे एवढेच काम नाही.

आता तर फडतूस, काडतूस म्हणायचे, हे काय चालले आहे राज्यात, असे सांगून पवार यांनी अदानींच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, टाटा, बिर्ला यांनी उद्योगाचा पाया रचला. लोकांना रोजगार दिला. त्याचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम झाला. अंबानी आणि अदानींनीही तसेच केले. आता अदानींबाबत समिती नेमण्यात येणार आहे. समिती नेमल्यानंतर वस्तूस्थिती समोर येईल. पण, आपण लगेच कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो हेही बरोबर नाही. अदानींमुळे महाविकास आघाडीत फूट पडणार नाही. शरद पवार, सोनिया गांधी आणि उध्दव ठाकरे पाठिशी आहेत. तोपर्यंत काही होणार नाही.

राज्यात वळीव पावसामुळे नुकसान झाले आहे. अशावेळी मुख्यमंत्री अयोध्या दाैऱ्यावर असल्याच्या प्रश्नावर पवार यांनी ‘मुख्यमंत्री पंचनामे करत नाहीत. आम्हीसुध्दा जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याबाबत सूचना करू, शकतो. मुंबईला गेल्यावर मुख्य सचिवांशी याबाबत बोलणार आहे. पण, श्रध्दा असल्याने आम्हीही कोणत्याही देवस्थानला जातो. काही लोक शिर्डी, जेजुरी, तिरुपतीला जातात. ज्यांना योग्य वाटते ते तसे जातात, असे स्पष्टीकरण दिले.जिल्हा बॅंकेचे काम चांगले...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील अग्रगण्य असणाऱ्या पहिल्या पाचमध्ये आहे. या बॅंकेचे नेतृत्व आतापर्यंत दिग्गजांनी केले आहे. आता नितीन पाटील यांच्या रुपाने नवीन पिढी चांगले काम करत आहे, असे ग़ाैरवोद्गारही अजित पवार यांनी काढले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे