शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

ऐन सुगीत मजुरांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:29 IST

औंध : खटाव तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा, आदी रब्बी पिकांची सगळीकडेच काढणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांना शेतमजुरांच्या टंचाईस ...

औंध : खटाव तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा, आदी रब्बी पिकांची सगळीकडेच काढणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांना शेतमजुरांच्या टंचाईस सामोरे जावे लागत आहे. मजुरांचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत आहे. मागील दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सुगी उरकण्याच्या मार्गावर शेतकरी वर्ग असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मजुरांची मागणी वाढली आहे. परिणामी टंचाई भासत होती.

गेल्या दोन दशकांमध्ये शेती करण्यासाठी त्या कुटुंबातील चार-पाच सदस्य नेहमी तयार असत. शेतकरी मजूर मिळाले नाही तरी आपल्या शेतातील सुगी तो उरकत असे; पण आता याउलट चित्र दिसून येत आहे. शेतकरी कुटुंबातील एखाद‌्दुसरा सदस्य शेतात राबताना दिसतो व बाकीची कामे तो शेतमजूर यांच्याकडून करून घेत आहे. ऐन सुगीच्या काळात या मजुरांना सोन्याचा भाव येतो. त्यामुळे मजुरांच्या विनंत्या करता-करता शेतकऱ्यांना घाम फुटू लागला आहे.

गहू, ज्वारी काढण्यासाठी मजुरांची दिवसाची हजेरी ४०० ते ५०० रुपयांच्या आसपास आहे; तर काही मजूर टोळ्या करून ज्वारी उपटून देत आहेत. मात्र त्यांचा एकरी दर हजारोंच्या घरात आहे. ज्वारी उपटल्यानंतर तिची काटणी, मळणी, पेंढ्या बांधणी व गंज लावणे या सर्वांच्या खर्चाचा हिशेब काढला तर ती बाजारातून विकत आणल्यासारखीच आहे. कधी-कधी तर उत्पादनापेक्षा खर्च अधिक येत आहे. त्यामुळे बळिराजा अक्षरशः वैतागला आहे.

(चौकट)

गहू काढण्यासाठी मशीनकडे कल

मजुरांची टंचाई असल्याने सध्या औंध परिसरात गहू काढण्याच्या हार्वेस्टर मशीनकडे शेतकऱ्यांचा कल आहे. एक एकर गहू काढण्यासाठी एका तासाच्या आत वेळ लागत असल्याने अवकाळीच्या फटक्यापासून वाचण्यासाठी व मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी मशीनकडे वळला आहे.

चौकट:-

पैरा पद्धतीवर भर

पैरा ही पद्धत शेतकऱ्यांना परवडणारी आहे. आपली दोन-तीन माणसे व पैरेवाल्यांची दोन-तीन माणसे मिळून आपले काम त्यांनी व त्यांचे काम आपण करायचे; यामुळे खर्चही नाही व कामही आटोपते; परंतु सगळीकडे पैरा चालतो असे नाही. पूर्वी बैलाने शेती करतानासुद्धा मध्यमवर्गीय शेतकरी बैलाचा पैरा करीत असे.

२१औंध

फोटो:-संग्रहित छायाचित्र