शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

सातारा लोकसभा निवडणुकीनंतर अजूनही आचारसंहिता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:10 IST

लोकसभा निवडणुकीचे कुरुक्षेत्र आता शांत झाले आहे. मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, अजूनही आचारसंहिता कायम असल्याने दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

ठळक मुद्दे सातारा लोकसभा निवडणुकीनंतर अजूनही आचारसंहिता कायम दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध

सागर गुजरसातारा : लोकसभा निवडणुकीचे कुरुक्षेत्र आता शांत झाले आहे. मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, अजूनही आचारसंहिता कायम असल्याने दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याचे स्पष्ट चित्र आहे.गेल्या दोन महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात लोकसभेचे कुरुक्षेत्र सुरू होती. २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील ११ लाख ९ हजार ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीसाठी यंदा १८ लाख ३८ हजार ९८७ मतदारांपैकी तब्बल ११ लाख ९ हजार ४३४ मतदारांनी मतदान केले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ९ लाख ७६ हजार ६८१ मतदारांनी मतदान केले होते. यंदा ४ टक्क्यांनी मतदान वाढले आहे.राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे, आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्र्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), शैलेंद्र वीर, सागर भिसे, अभिजित बिचुकले (अपक्ष) या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.आता २३ मे पर्यंत निकालाची वाट पाहावी लागणार आहे. मतदान झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होईल, असा अंदाज जिल्ह्यातील नागरिकांना होता. मात्र तसे अद्याप झालेले नाही. आचारसंहितेचे निर्बंध अजूनही कायम आहे.

रात्री उशिराच्या कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. फेसबुक, ट्विटर तसेच इतर सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची अजूनही करडी नजर राहणार आहे. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. यामुळे आचारसंहितेचे निर्बंध संपूर्ण महाराष्ट्रात कायम ठेवण्यात आले आहेत.२९ मे रोजी या मतदार संघात मतदाननंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी या १७ मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. हे सर्व मतदारसंघ महाराष्ट्रात येतात.कार्यक्रमांवर बंदीजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये यात्रा सुरू आहेत. या यात्रांमधील ग्रामदैवतांचा छबिना रात्रभर सुरू ठेवण्यात आला. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर रात्री दहानंतर बंदी घालण्यात आली होती. अनेक गावांनी हे सांस्कृतिक कार्यक्रम सकाळच्या वेळेत घेतले.

लोकसभेची आचारसंहिता कायम आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाहीत, त्यामुळे आचारसंहितेचे निर्बंध अजूनही लागू आहेत.- श्वेता सिंघल,जिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसाताराcollectorजिल्हाधिकारी