शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

कंबरडं मोडल्यानंतरच होतंय देवाचं दर्शन

By admin | Updated: January 23, 2015 23:39 IST

शिखर शिंगणापूर रस्त्याची दुरवस्था : उपाययोजनेची मागणी; यात्रेच्या तोंडावर भाविकांची कुचंबणा

पळशी : महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूर येथील शिंगणापूर बसस्थानक ते शिखर शिंगणापूर मंदिर या एक किलोमीटर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तर विश्रामगृहाजवळील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी साईडपट्ट्याही खचलेल्या आहेत. मुळातच हा रस्ता एकेरी असून, ठिकठिकाणी खडी उखडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिखर शिंगणापूर यात्रा अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे, असे असताना याची कोणतीही दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.या रस्त्यावरच्या साईडपट्ट्या खराब झाल्याने धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन बाजूला घेताना अतिशय अडचणी येत आहेत. रस्त्याकडेलाच विश्रामगृहाजवळच खडीचे ढीग वापराविना तसेच पडून आहेत. मंदिराकडे जाणारा पेठेतील रस्ता नागमोडी असून, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच ग्रामस्थांत नाराजी आहे. येथे महाराष्ट्रासह परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या भाविकांना रस्त्यावरून अडचणींचा सामना करतच जावे लागते. यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीची सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीबाबत सातत्याने मागणी करूनही अद्यापही रस्त्यातील खड्डे भरून घेतले नाहीत. या रस्त्याचे टेंडर मंजूर होऊनही संबंधित ठेकेदाराने काम केलेले नाही. जिल्हा परिषदेने दुसऱ्या ठेकेदाराला काम द्यावे व यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्ती करावी.-राजाराम बोराटे, उपसरपंच, शिखर शिंगणापूरयात्रा अवघ्या अडीच महिन्यांवर शिखर शिंगणापूरची यात्रा ३१ मार्चला असून, या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्राकाळात वाहनांची वर्दळ वाढणार असून, अद्यापही रस्ता दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूरची सर्वदूर ओळख आहे. राज्यातील इतर देवस्थानांच्या मानाने इथला विकास खुंटलेलाच आहे. येथे येणाऱ्या लाखो भाविकांना रस्त्यांच्या गैरसोयीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. - दीपकराव तंटे-बडवेग्रामस्थ, शिखर शिंगणापूरबसस्थानक ते मंदिर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. रस्त्याच्या दुरवस्थामुळे भाविक हैराण झाले आहेत. संबंधित विभागाने यात्रेपूर्वी दुरुस्ती करावी. यात्रा अवघ्या अडीच महिन्यांवर आली तरी प्रशासनाचे अद्याप दुर्लक्ष आहे. -संपत शेंडे,ग्रामस्थ, शिखर शिंगणापूर