शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

अखेर श्रमाच्या घामाला मिळालं फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:12 IST

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. ...

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यामधील १९८ गावांनी तब्बल ५० दिवस घाम गाळून श्रमदान करत लाखो घनमीटरचे जलसंधारणाचे काम केले. त्यानंतर पडलेल्या पहिल्याच पावसात केलेल्या पाणलोटच्या कामामुळे शिवारातील समतल चर, ओढ्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे.राज्यात दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अनेक गावांमध्ये दुष्काळ पडल्याने हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर वणवण करावी लागते. तर जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकºयाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना विकण्याची वेळ येते. त्यानंतर प्रशासन जागे होऊन टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याची धडपड करत असते. या दुष्काळी चक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी चार वर्षांपूर्वी अभिनेता अमीर खान याने पाणी फाउंडेशनची सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेली अनेक गावे टँकरमुक्त होऊन जलयुक्त झाली.यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यातील अनेक गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील १९८ गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या निमित्ताने पाण्याबाबत साक्षरता होऊन पडणाºया पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब वाचवण्याचा दुष्काळग्रस्तांनी निर्धार केला. त्यासाठी अडीच वर्षांच्या बालकापासून ९० वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्वच जण हातात टिकाव, खोºयाच्या साह्याने शिवारात पाणी साठवण भांडी तयार करण्यासाठी घाम गाळला. अनेक वर्षांपासून राजकारण, निवडणुकीतील गट-तटांमुळे दुंभगलेली मन एकत्र आली. विद्यार्थी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक, महिल आणि वृद्धांनी एकमेकांच्या मदतीने सलग ५० दिवस श्रमदान केले.श्रमदान आणि मशीनद्वारे गावोगावी हजारो घनमीटर पाणी क्षमतेची जलसंधारणाची कामे झाली. स्पर्धा संपल्यानंतर सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले होते. त्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणलोट विकासाच्या कामांमध्ये पाणी साठले आहे. वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडवल्यामुळे ते जमिनीत मुरले. पहिल्याच पावसात कोरड्या पडलेल्या कूपनलिका व विहिरी काटोकाट भरल्याने श्रमकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.वृक्षारोपणासाठी पुढाकारवॉटर कप स्पर्धेच्या काळात अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाचे काम करण्यात आले. तसेच स्पर्धेचा भाग असलेल्या वृक्षारोपणासाठी उन्हाळ्यात खड्डे खणले होते. पाऊस पडल्याने शिवारात पाणी उपलब्ध झाले. त्या खणलेल्या खड्ड्यांमध्ये गावोगावी वृक्षारोपण करण्याची जोरात सुरुवात झाली आहे.