शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील पोस्टने प्रशासनाची पळापळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:16 IST

सातारा : रस्त्यात असणारा अडथळा रीतसर दूर केला जात नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वखर्चाने तो अडथळा दूर करुन थेट मुख्यंमत्र्यांना त्या कामाचे फोटो पाठविण्याच्या दिलेल्या इशाºयाने प्रशासन खडबडून जागे झाले. ‘व्हॉटस अ‍ॅप’ गु्रपच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या या इशाºयाचा भलताच ‘इफेक्ट’ सातारा शहरात पाहायला मिळत आहे.त्याचे झाले असे... येथील पोवईनाका ते ...

ठळक मुद्दे रस्त्यावरील काम : स्वखर्चाने करून मुख्यमंत्र्यांना त्याचे फोटो पाठविण्याचा दिला होता इशाराचार दिवसांची मुदतही दिली. त्यानंतर काम करुन त्याचे फोटो मुख्यमंत्र्यांना पाठवू, ही परिस्थिती नैसर्गिक नसून मानवनिर्मित असून येथे वाहतूक भरपूर असते.

सातारा : रस्त्यात असणारा अडथळा रीतसर दूर केला जात नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वखर्चाने तो अडथळा दूर करुन थेट मुख्यंमत्र्यांना त्या कामाचे फोटो पाठविण्याच्या दिलेल्या इशाºयाने प्रशासन खडबडून जागे झाले. ‘व्हॉटस अ‍ॅप’ गु्रपच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या या इशाºयाचा भलताच ‘इफेक्ट’ सातारा शहरात पाहायला मिळत आहे.त्याचे झाले असे... येथील पोवईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्त्यावर असणाºया जिल्हा परिषद चौकात ड्रेनेजचा खड्डा धोकादायक स्थितीत ठेवण्यात आला होता. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याने नगरपालिकेनेही हात वर केले. हा रस्ता पोवईनाक्यापासून पुढे संगमनगरपर्यंत रुंद आहे. पण ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे जिल्हा परिषदेच्या खालच्या चौकातच असणाºया या ड्रेनेजच्या खड्ड्यावर लोखंडी जाळी टाकून चहू बाजूंनी मोठे दगड ठेवण्यात आले होते. या ठिकाणी चार रस्ते मिळतात. रात्रीच्यावेळी या खड्ड्याभोवती ठेवलेले दगड दिसत नसल्याने अनेक जण ठेचकळून पडले होते. त्यात या खड्ड्याभोवती चिखलाचे साम्राज्य साठलेले. अनेकदा दुचाकी वाहनेही याठिकाणी अडकून पडत होती. तसेच पादचाºयांनाही त्रास होत होता.मानवनिर्मित अडथळा दूर होत नव्हता. बांधकाम विभाग याबाबत गांभीर्याने दखल घेत नसल्याने संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेचे चिन्मय कुलकर्णी यांनी भलतीच युक्ती राबविली. त्यांनी पे्रस नावाच्या व्हॉटस अ‍ॅप गु्रपवर ही परिस्थिती मांडली. ‘जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानापासून पोवईनाक्याकडे जाताना जिल्हा बँकेसमोर गेल्या कित्येक दिवसांपासून रस्ता बंद ठेवलाय व त्याच्या बाजूला मोठ-मोठे दगड लावले आहेत व ही परिस्थिती नैसर्गिक नसून मानवनिर्मित असून येथे वाहतूक भरपूर असते. या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे चार दिवसांत येथील परिस्थिती सुधारली नाही तर मात्र आम्हाला आमची व प्रवाशांची काळजी म्हणून स्वखर्चाने काम करुन मुख्यमंत्र्यांना त्याचे फोटो पाठवावे लागतील,’ असा इशारा दिला.दरम्यान, यानंतरही कुलकर्णी यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना भेटून परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. चार दिवसांची मुदतही दिली. त्यानंतर काम करुन त्याचे फोटो मुख्यमंत्र्यांना पाठवू, असे सांगितल्याने बांधकाम विभागाने कार्यवाही करत या खड्ड्याभोवती बॅरिगेटस उभे केले.बांधकाम विभागाने हे काम हाती घेतले नसते तर लोकांच्या रक्षणासाठी आम्ही ते स्वखर्चाने करणार होतो. व्हॉटस अ‍ॅप गु्रपवर दिलेला हा इशारा भलताच लागू पडला आहे.- चिन्मय कुलकर्णी