शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात होणार उत्पादन शुल्क विभागाची प्रशासकीय इमारत

By नितीन काळेल | Updated: October 26, 2023 20:39 IST

पालकमंत्र्यांचे प्रयत्न : सर्व सुविधांयुक्त; साडे चाैदा कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

नितीन काळेल 

सातारा : राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा येथील अधीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय आणि विश्रामगृह इमारतीच्या साडे चाैदा कोटी रुपये खर्चाच्या बांधकामास गुरुवारी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून लवकरच सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारत साताऱ्यातील गोडोलीत उभी राहणार आहे.साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्कचा कार्यभार हाती घेतल्यापासून विभागाच्या कामात सुसूत्रता आणि कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. तर सातारा येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीची मान्यता प्रलंबित होती. मात्र, मंत्री देसाई यांच्या प्रयत्नातून या कामास गृह विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला.

सातारा शहरातील गोडोली येथील एकूण ०.४६ हेक्टर क्षेत्रावरील विभागाच्या मालकीच्या जागेवर अधीक्षक कार्यालयाची इमारत तसेच विश्रामगृह इमारत बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी १४ कोटी ५० लाख ८० हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे लवकरच सर्व सुविधांयुक्त प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे.उत्पादन शुल्क विभाग शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा शासकीय विभाग आहे. गेल्या आर्थिक वर्षात विभागाने विक्रमी महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. उत्पादन शुल्कला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास विभागाची कार्यक्षमता आणखी वाढेल, असा विश्वास आहे. त्याच भूमिकेतून सातारा येथे अधीक्षक कार्यालय आणि विश्रामगृहाच्या इमारतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारत होईल, याचा आनंद आहे.

- शंभूराज देसाई, पालकमंत्री