...........
जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर प्रचंड ताण पडत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे डॉक्टरांना बारा तास ड्यूटी करावी लागत आहे तसेच परिचारिका, सफाई कामगार यांचेही काम वाढले आहे. सतत रुग्णांचा ओघ रुग्णालयात वाढत असल्याने कर्मचारी अक्षरश: तणावाखाली आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सोबतीला आणखी नव्या दमाची टीम येणे गरजेचे आहे तरच या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊ शकतो. या कर्मचाऱ्यांना ही आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी असते. रोज रुग्णालयात अनेक रुग्णांशी संपर्क येत असतो. त्यामुळे कधी कोरोना बाधित आपण होईल हे सांगता येत नाही, या चिंतेतही अनेक कर्मचारी असतात.
.......
सातारा शहरांमध्ये अनेकजण विनाकारण बाहेर दुचाकी घेऊन फिरत आहेत. अशा लोकांच्या पोलिसांनी दुचाकी जप्त करण्याचा सपाटा लावला असून बुधवारी दिवसभरात १७ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. गतवर्षी पोलिसांनी तब्बल ४७० दुचाकी जप्त केल्या होत्या. मात्र, यंदा फारसे कडक अंमलबजावणी पोलिसांनी केली नव्हती. परंतु आता ते दिवस आले असून पोलिसांनी दुचाकी जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारातच लावल्या जातील. त्यानंतर आपापल्या दुचाकीची कागदपत्रे दाखवून त्या दुचाकी पोलीस ठाण्यातून दिल्या जाणार आहेत.