शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉटस अ‍ॅप’ वरील इशाºयाने प्रशासनाची पळापळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 17:09 IST

सातारा : रस्त्यात असणारा अडथळा रीतसर दूर केला जात नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वखर्चाने तो अडथळा दूर करुन थेट मुख्यंमत्र्यांना त्या कामाचे फोटो पाठविण्याच्या दिलेल्या इशाºयाने प्रशासन खडबडून जागे झाले. ‘व्हॉटस अ‍ॅप’ गु्रपच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या या इशाºयाचा भलताच ‘इफेक्ट’ सातारा शहरात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील काम स्वखर्चाने करण्याचा इशारामुख्यमंत्र्यांना त्याचे फोटो पाठविण्याचा दिला होता इशारासातारा शहरात इशाºयाचा भलताच ‘इफेक्ट’ प्रशासन खडबडून जागे झाले

सातारा : रस्त्यात असणारा अडथळा रीतसर दूर केला जात नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वखर्चाने तो अडथळा दूर करुन थेट मुख्यंमत्र्यांना त्या कामाचे फोटो पाठविण्याच्या दिलेल्या इशाºयाने प्रशासन खडबडून जागे झाले. ‘व्हॉटस अ‍ॅप’ गु्रपच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या या इशाºयाचा भलताच ‘इफेक्ट’ सातारा शहरात पाहायला मिळत आहे.

त्याचे झाले असे...येथील पोवईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्त्यावर असणाºया जिल्हा परिषद चौकात ड्रेनेज धोकादायक स्थितीत ठेवण्यात आला होता. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याने नगरपालिकेनेही हात वर केलेले. हा रस्ता पोवईनाक्यापासून पुढे संगमनगरपर्यंत रुंद आहे. पण ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे जिल्हा परिषदेच्या खालच्या चौकातच असणाºया या ड्रेनेजच्या खड्ड्यावर लोखंडी जाळी टाकून चहू बाजूंनी मोठाले दगड ठेवण्यात आले होते.

या ठिकाणी चार रस्ते मिळतात. तसेच बँक, दवाखाने, शाळा, महाविद्यालये, जिल्हा परिषद इतकेच काय नेत्यांची ये-जा असणारे विश्रामगृह देखील जवळच असल्याने या रस्त्यावर मोठी रहदारी असते. रात्रीच्यावेळी या खड्ड्याभोवती ठेवलेले दगड दिसत नसल्याने अनेक जण ठेचकळून पडले होते. त्यात या खड्ड्याभोवती चिखलाचे साम्राज्य साठलेले. अनेकदा दुचाकी वाहनेही याठिकाणी अडकून पडत होती. तसेच पादचाºयांनाही त्रास होत होता.

 मानवनिर्मित अडथळा दूर होत नव्हता. बांधकाम विभाग याबाबत गांभीर्याने घेत नसल्याने संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेचे चिन्मय कुलकर्णी यांनी भलतीच युक्ती राबविली. त्यांनी पे्रस नावाच्या व्हॉटस अ‍ॅप गु्रपवर ही परिस्थिती मांडली.

‘जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानापासून पोवईनाक्याकडे जाताना जिल्हा बँकेसमोर गेल्या कित्येक दिवसांपासून रस्ता बंद ठेवलाय व त्याच्या बाजूला मोठ मोठे दगड लावलेत व ही परिस्थिती नैसर्गिक नसून मानवनिर्मित असून येथे वाहतूक भरपूर असते. या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे ४ दिवसांत येथील परिस्थिती सुधारली नाही तर मात्र आम्हाला आमची व प्रवाशांची काळजी म्हणून स्वखर्चाने काम करुन मुख्यमंत्र्यांना त्याचे फोटो पाठवावे लागतील,’ असा इशारा दिला.

दरम्यान, यानंतरही कुलकर्णी यांनी पाठपुरावा सुरुच ठेवला. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना भेटून परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. तसेच चार दिवसांची मुदतही दिली. त्यानंतर आम्हीच काम करुन त्याचे फोटो मुख्यमंत्र्यांना पाठवू, असे सांगितल्याने बांधकाम विभागाने तत्काळ कार्यवाही करत या खड्ड्याभोवती बॅरिगेटस उभे केले. खड्ड्याच्या बाजूला असणारे दगड देखील काढून बाजूला टाकण्यात आले. हे काम सुरु झाल्याने रस्त्याचे रुंदीकरण शक्य होणार आहे.बांधकाम विभागाने हे काम हाती घेतले नसते तर लोकांच्या रक्षणासाठी आम्ही ते स्वखर्चाने करणार होतो. व्हॉटस अ‍ॅप गु्रपवर दिलेला हा इशारा भलताच लागू पडला आहे.- चिन्मय कुलकर्णी