शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आदिती स्वामी हिच्या सुवर्णवेधने साताऱ्याचा लौकिक उंचावला, उदयनराजेंकडून विशेष कौतुक

By सचिन काकडे | Updated: October 12, 2023 18:02 IST

सातारा : साताऱ्याची राष्ट्रीय पातळीवरील अव्वल तिरंदाज आदिती स्वामी हिने चीनमध्ये झालेल्या आशियायी स्पर्धेतील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तिच्या ...

सातारा : साताऱ्याची राष्ट्रीय पातळीवरील अव्वल तिरंदाज आदिती स्वामी हिने चीनमध्ये झालेल्या आशियायी स्पर्धेतील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तिच्या या सुवर्णवेधमुळे साताऱ्याचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहोचला आहे. अशा गुणवंत खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा पुरविल्यास त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी होत राहील, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या पुढाकाराने आदिती स्वामी हिचा जलमंदिर येथे खा. उदयनराजे भोसले व दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते गुरुवारी विशेष सत्कार करण्यात आला. आदितीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे उदयनराजे यांनी तिचे विशेष कौतुक केले.उदयनराजे म्हणाले, क्रीडा क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. मात्र आदितीने अत्यंत जिद्द आणि एकाग्रतेच्या बळावर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली, हे कौतुकास्पद आहे. साताऱ्याच्या मातीत प्रचंड गुणवत्ता आहे. जिल्हा पातळीवर खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाल्यास ते जागतिक दर्जाची कामगिरी नोंदवू शकतात. सुहास राजेशिर्के यांनी सुद्धा आदितीच्या कामगिरीचे कौतुक केले . आर्चरी खेळात अव्वल कामगिरी करणारी आदिती ही गुणवान खेळाडू आहे. सातत्यपूर्ण सराव व अव्वल कामगिरीसाठी साताऱ्यात क्रीडा सुविधा कशा उपलब्ध होतील, यासाठी क्रीडा विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल.कार्यक्रमासाठी संस्कार भारती सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर, विश्वनाथ भाकरे, रवींद्र माने, विजय चौगुले, रवींद्र भोकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAsian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३