शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

दुचाकींवरून शर्यत लावणाऱ्या तब्बल ५१ युवकांवर कारवाई, कऱ्हाडातील प्रकार 

By दीपक शिंदे | Updated: July 31, 2024 12:14 IST

कऱ्हाड : विद्यानगर-कऱ्हाड येथे महाविद्यालयाच्या गजबजलेल्या रस्त्यातून दुचाकींची शर्यत लावणाऱ्या तब्बल ५१ युवकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तसेच संबंधित ...

कऱ्हाड : विद्यानगर-कऱ्हाड येथे महाविद्यालयाच्या गजबजलेल्या रस्त्यातून दुचाकींची शर्यत लावणाऱ्या तब्बल ५१ युवकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तसेच संबंधित युवकांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली. महाविद्यालय परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने लक्ष केंद्रित केले असून, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी दिला आहे.विद्यानगर येथे विविध शाखांचे शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये आहेत. तसेच माध्यमिक विद्यालयांची संख्याही या परिसरात जास्त आहे. त्यामुळे लहान मुलांसह युवक-युवतींचा कऱ्हाड-मसूर रस्त्यावर मोठा राबता असतो. त्यातच वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणावर असल्याने रस्त्यात गर्दी असते. अशात काही युवक बनवडी फाट्यापासून ओगलेवाडीपर्यंत दुचाकींची शर्यत लावत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करून संबंधित रस्त्यावर गस्त सुरू केली.बनवडीफाटा ते ओगलेवाडी मार्गावर शर्यत लावणारे तब्बल ५१ युवक पोलिसांना आढळून आले. हे युवक भर पावसात भरधाव वेगात दुचाकी चालवित होते. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या तसेच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारक व पादचाऱ्यांच्या जिवाला धोका होता. ही बाब लक्षात आल्यानंतर सहायक निरीक्षक सूर्यवंशी यांनी संबंधित युवकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच काही युवकांच्या पालकांनाही वाहतूक शाखेत बोलावून घेण्यात आले. युवकांनी केलेल्या कृत्याबाबत पालकांना माहिती देऊन त्यांना समज देण्यात आली.

महाविद्यालय परिसरात रहदारी जास्त असते. तसेच अनेक युवक दुचाकी घेऊन महाविद्यालयात येतात. त्यामुळे या परिसरावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून दुचाकी अथवा इतर कोणतेही वाहन चालविताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. - संदीप सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliceपोलिस