सातारा : शहरालगत असणाऱ्या सैदापूर हद्दीतील मोळाचा ओढा परिसरात विनामास्क फिरणाऱ्या बाबासाहेब राजेशिर्के (वय ३५, रा. १६५, गुरुवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, दि. २४ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, बाबासाहेब राजेशिर्के हा युवक कोरोना महामारीत त्याच्या दुचाकीवरून (एमएच ११ - बीटी ६९९९) विनामास्क फिरत होता. यावेळी त्याला पोलिसांनी अडवले. मात्र, यावेळी त्याने माझ्यावर कारवाई करू नका, असे म्हणत कारवाईस अडथळा निर्माण केला. यामुळे त्याच्यावर पोलीस नाईक राहुल सुदाम राऊत यांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कदम हे करत आहेत.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:38 IST