शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात १७ खत, बियाणे विक्री दुकानांवर कारवाईचा बडगा; १४ सेवा केंद्रांचे निलंबन, ३ कायमस्वरुपी रद्द

By नितीन काळेल | Updated: June 20, 2023 11:55 IST

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्यात १२ भरारी पथकांमार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी

सातारा : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने अप्रमाणित व जादा दराने कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्या १७ दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये १४ दुकानांचे निलंबन तर ३ केंद्रावर कायमस्वरुपी रद्दची कारवाई करण्यात आली आहे.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खते, बियाणे तसेच विविध पातळीवर तयारी केलेली आहे. तर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्यात १२ भरारी पथकांमार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री, अप्रमाणित कृषी निविष्ठांची विक्री करणे आदी प्रकार आढळून आल्यास संबंधित केंद्रावर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे. त्यातूनच १४ दुकानांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. यामध्ये ३ बियाणे विक्रेते, ९ खत आणि २ किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे. तर २ खत विक्रेते व एका किटकनाशक विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाने रासायनिक खतांची उपलब्धताही पुरेशा प्रमाणात केली आहे. यामध्ये युरिया १६ हजार ७६४ मेट्रीक टन आहे. डीएपी १० हजार २८७ मेट्रीक टन, म्युरेट ऑफ पोटॅश ९२६ मेट्रीक टन, सुपर फॉस्फेट ९ हजार ३७५ मेट्रीक टन तसेच इतर संयुक्त खते २५ हजार ९२७ मेट्रीक टन उपलब्ध आहेत.जिल्ह्यात बियाणांचा पुरवठाही योग्य प्रमाणात झाला आहे. यामध्ये ज्वारीचे ६८५ क्विंटल उपलब्ध आहे. बाजरी १ हजार ५९५ क्विंटल, भात १० हजार ७४९ क्विंटल, सोयाबीन १४ हजार ९६ क्विंटल, घेवडा २ हजार १७९ क्विंटल, मका ६ हजार ३४७ क्विंटल बियाणे कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी करताना विक्रेत्यांकडून पक्की पावती घ्यावी. खताची ऑफलाईन विक्री झाल्याचे आढळून आल्यास संबंधित विक्री केंद्रावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

कृषी निविष्ठांच्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निविष्ठांबाबत तक्रार असल्यास संबंधित तालुका तक्रार निवारण कक्ष किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्ष येथे संपर्क साधावा. - विजय माईनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्र