शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील १८२३ ग्राहकांची बत्ती गुल!, महावितरणची कारवाई; तब्बल २२ कोटींची थकबाकी

By सचिन काकडे | Updated: December 27, 2023 19:05 IST

सातारा : वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांवर महावितरण कडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. या अंतर्गत ...

सातारा : वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांवर महावितरण कडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यातील १ हजार ८२३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, संबंधितांनी थकबाकी भरून तो पूर्ववत करावा, असे आवाहन महावितरणने केले अहे. थकबाकीदारांकडून वीजबिलांच्या रकमेचा भरणा होत नसल्याने महावितरणने वसूली मोहीम गतीमान करण्याबरोबरच वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. थकबाकीदार ग्राहकांची थकीत रक्कम किती आहे? हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी केली जात आहे. यात परस्पर इतर ठिकाणावरून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ८६ हजार ग्राहकांकडे तब्बल २२ कोटी २ लाखांची थकबाकी असून, आतापर्यंत १ हजार ८२३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक कसरत सुरू आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरणelectricityवीज