औंध : औंधसह सांगली जिल्ह्यात विविध गुन्ह्यांत सहभागी असलेला व २००८ पासून फरार असलेला आरोपी औंध पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतला आहे. तेरा वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक केल्याबद्दल औंध पोलिसांचे कौतुक होत आहे.
नवनाथ ऊर्फ नव्या लत्या काळे (वय ३८) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. याकामी पोलीस नाईक प्रशांत पाटील व राहुल वाघ यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. हा आरोपी सांगली जिल्हा न्यायालय, आष्टा, चिंचणी, कडेगाव, सातारा जिल्ह्यातील खंडाळा औंधसह विविध ठिकाणी आरोपी हवा होता. सुमारे १७ ते १८ गुन्ह्यांत हा आरोपी सहभागी असल्याची पोलिसांनी माहिती दिली. औंध पोलिसांच्या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी कौतुक केले.