शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणाला चार वर्षे सक्तमजुरी

By दत्ता यादव | Updated: January 7, 2024 20:50 IST

या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे, हे हर्षद दणदिवे याला माहीत होते. असे असतानाही त्याने तिला गोड बोलून एका ठिकाणी नेले.

सातारा : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हर्षद पप्पू रणदिवे (वय २०, रा. चौधरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) याला विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश के. व्ही. बोरा यांनी चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे, हे हर्षद दणदिवे याला माहीत होते. असे असतानाही त्याने तिला गोड बोलून एका ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुला मारीन, अशी धमकीही दिली.

फलटण शहर पोलिस ठाण्यात रणदिवे याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ११ सप्टेंबर २०१९ रोजी घडली होती. तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक व्ही. ए. देसाई यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या दरम्यान एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी हर्षद रणदिवे याला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

सहायक सरकारी वकील मंजूषा तळवळकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना प्राॅसिक्युशन स्काॅडचे पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी, सुनील सावंत, सहायक फाैजदार शशिकांत गोळे, अंमलदार गजानन फरांदे, मंजूर मणेर यांनी सहकार्य केले.