म्हसवड : ‘अभयसिंह जगताप यांना प्रदेशचे पद देऊन राष्ट्रवादी पक्षाने माण तालुक्यासोबत जिल्ह्याचा सन्मान केला आहे. पक्षाने दिलेल्या संधीचा वापर करून राष्ट्रवादी पक्ष युवकांमध्ये रुजवावा, तसेच प्रदेशचे काम करत असताना अभयसिंह जगताप यांनी माण-खटावकडे जास्त लक्ष द्यावे,’ असे प्रतिपादन हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले.
अभयसिंह जगताप यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, गोंदवले बुद्रुकचे सरपंच जयप्रकाश कट्टे, लालासाहेब ढवाण, संजय जगताप, बालाजी जगदाळे, हणमंत पाटील, वैभव जाधव, युवा नेते शंभूराज जाधव, सागर जाधव, प्रशांत सूर्यवंशी, आशिष पवार, ओंकार पवार, संदीप काळे, दत्तात्रय देवकर, पै. पृथ्वीराज हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते.
अभयसिंह जगताप म्हणाले, ‘पक्षाने माझी केलेली निवड हा फक्त माझा नव्हे तर माण-खटावचा सन्मान आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची मजबूत फळी तयार करण्यावर माझा भर असणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख म्हणून युवकांची कार्यशाळा घेण्याचा माझा प्रयत्न आहे.’
०४म्हसवड
फोटो - अभयसिंह जगताप यांचा सत्कार करताना हर्षदा देशमुख-जाधव, जयप्रकाश कट्टे व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.