शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

अबब.. दंडाचा आकडा अर्ध्या कोटीवर !

By admin | Updated: June 11, 2015 00:51 IST

बेकायदा गौण खनिज : तस्करांच्या मानगुटीवर ‘महसूल’ची टाच; वाळू पाठोपाठ मुरूम वाहतूकदारांनाही दणका

संजय पाटील -कऱ्हाड --गत काही वर्षांत कऱ्हाड तालुक्याच्या भौगोलिकदृष्ट्या संपन्नतेचा पुरेपूर फायदा तस्करांनी उठवलाय. वाळू, मुरूम आणि माती या गौण खनिजाचं तस्करांनी जेसीबी लावून उत्खनन केलं. या उत्खननातून त्यांनी अक्षरश: खोऱ्यानं पैसाही ओढला. मात्र, गेल्या वर्षभरात या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम महसूल विभागाकडून सुरू आहे. ‘महसूल’ने गेल्या काही महिन्यांत बेकायदा गौण खनिजाचं उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. या कारवाईतून वसूल झालेली दंडाची रक्कम आता अर्ध्या कोटीवर पोहोचली आहे. महसुलाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्याचा प्रथम क्रमांक लागतो. कऱ्हाड हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील काही दुष्काळी गावे सोडली तर कृष्णा व कोयना या दोन मोठ्या नद्यांमुळे इतर भागात बागायती क्षेत्र व सुपिकता जास्त प्रमाणात आहे. तसेच येथे गौण खनिजही मोठ्या प्रमाणावर आढळते. कृष्णा, कोयना यासह अन्य उपनद्यांतील वाळू, नदीकाठची लाल माती व डोंगराळ भागातील मुरूम या गौण खनिजामुळे तालुक्यातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. मात्र, या गौण खनिजाचे लूट करण्याचे प्रमाणही येथे जास्त आहे. तालुक्यात कृष्णा नदीमध्ये शासनाच्या माध्यमातून काही वाळू ठेके देण्यात आले आहेत. मात्र, अनेकवेळा या ठेक्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणांहूनही बेकायदेशिररीत्या वाळूउपसा केला जातो. तसेच वाळू ठेक्यांवरही नियम धाब्यावर बसवून मर्यादेपेक्षा जास्त उपसा होतो. महसूल विभागाची परवानगी न घेता नदीकाठावरील लालमातीचे उत्खनन केले जाते. कधी-कधी लालमाती उत्खननासाठी परवाना घेतला जातो. मात्र, परवान्यापेक्षा किती तरी पटीने जास्त लालमातीचे उत्खनन करून नदीकाठ पोखरला गेल्याची उदाहरण आहेत. मुरूमाबाबतीतही तस्करांकडून हाच प्रकार होतो. महसूल विभागाला अंधारात ठेवून बेधडकपणे वाळू, लालमाती तसेच मुरूमाची लूट होते. संबंधित विभागातील काही महसूल कर्मचारीही या साखळीत गुंतल्याची चर्चा असते. मात्र, अद्यापतरी बेकायदा वाळू, माती व मुरूमाबाबत कोणत्याही महसूल कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही. गेल्या वर्षभरापासून महसूल विभागाने या तस्करांविरोधात कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. बेकायदेशिररीत्या गौण खनिजाचे उत्खनन, उपसा किंवा वाहतूक करताना आढळल्यास संबंधितांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात करण्यात आलेल्या एकूण कारवायांमध्ये वाळूबाबत झालेल्या कारवार्इंची संख्या जास्त आहे. मुरूम वाहतूकदारांवरही कारवाई करण्यात आली आहे. आठपैकी तीन वाळू ठेके बंदकऱ्हाड तालुक्यात कृष्णा नदीपात्रात यावर्षी वाळूचे आठ ठेके देण्यात आले होते. त्यापैकी गोळेश्वर-कार्वे, गोवारे, कोपर्डे हवेली-घोणशी, बेलवडे हवेली व कालगाव येथील वाळू ठेके सुरू आहेत, तर खराडे, नवीन कवठे व तासवडे येथील ठेके बंद असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. जुने कवठे-वडोली भिकेश्वर येथील एक अनधिकृत वाळू ठेका चार दिवसांपूर्वीच महसूल विभागाने उद्ध्वस्त केला आहे. सर्वाधिक कारवाई वाळूचीएप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या एका वर्षाच्या कालावधीत तसेच एप्रिल २०१५ ते आजअखेर गौण खनिज उत्खनन, उपसा व वाहतूक करणाऱ्या एकूण १०९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक वाहने वाळूची आहेत. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या एका वर्षात वाळूच्या ४० वाहनांवर तसेच एप्रिल २०१५ ते आजअखेर वाळूच्या ४३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून तब्बल ४० लाख ६१ हजार दंड वसूल झाला आहे. मुरूमाच्या २२ वाहनांना दंडएप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या एका वर्षाच्या कालावधीत मुरूमाची वाहतूक करणाऱ्या २२ वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. संबंधित वाहनधारकांकडून १ लाख २९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल २०१५ ते आजअखेर मुरूमाच्या एकाही वाहनावर कारवाई झालेली नाही.लालमातीकडे दुर्लक्षवाळू व मुरूमाविरोधात कडक धोरण अवलंबणाऱ्या महसूल विभागाचे लालमातीच्या उत्खननाकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या एका वर्षात लालमातीची बेकायदा वाहतूक करणाऱ्या फक्त चार वाहनांवर कारवाई झाली आहे. संबंधितांना ६५ हजारांचा दंड करण्यात आला आहे.गौण खनिजाच्या माध्यमातून शासनाला महसूल मिळतो; मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व अटींचे व्यावसायिक पालन करीत नाहीत. त्यामुळे कारवाई करावी लागते. गौण खनिजाचे बेकायदेशिररीत्या उत्खनन करणाऱ्यांना चाप बसावा, त्यांना शिस्त लागावी, यासाठी यापुढे कडक धोरण अवलंबले जाणार आहे. - किशोर पवार, प्रांताधिकारी, कऱ्हाड