शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

दुष्काळी माणमध्ये श्रमदानासाठी येणार आमिरखान

By admin | Updated: March 21, 2017 13:00 IST

वॉटर कप स्पर्धा : बिदालमध्ये ९ एप्रिलला उपस्थिती; तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग राहणार

आॅनलाईन लोकमतदहिवडी : वॉटर कप स्पर्धेत राज्यातील ३० तालुक्यांतील २०६७ गावे उतरली आहेत. यामध्ये माण तालुक्यातील ३२ गावांनीही सहभाग घेतला आहे. तालुक्यातील बिदाल गावातील श्रमदानासाठी दि. ९ एप्रिल रोजी अभिनेता अमिर खान येणार आहे. त्यामुळे या स्पधेर्ला आणखी बळ मिळणार आहे.

वॉटर कप स्पर्धेत उतरलेल्या माणमधील गावांनी वॉटर कप जिंकायचाच या हेतूने कामाला गती दिली आहे. ही स्पर्धा दि. ८ एप्रिल ते २२ मे अशी होणार असली तरी प्रत्येक गावाने कामाचा आराखडा तयार केला आहे. ठिकठिकाणी ग्रामसभेचे आयोजन सुरु आहे. सर्व राजकीय वैर विसरुन गावची गावं पाण्यासाठी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहेत. प्रशासकीय अधिकारीही दिवसरात्र झटत आहेत. माण तालुक्यातील ३२ गावे ही प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास आधिकारी सांगवे, कृषीअधिकारी राजेश जानकर यांनी प्रत्येकी ८ प्रमाणे दत्तक घेतली आहेत. सगळीच गावे पाणी समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ यांनी पिंजून काढली असून गावामध्ये माती परीक्षण, शोषखड्डे, आगकाडी मुक्त शिवार याची कामे सुरु आहेत.

माण तालुक्यातील सहभागी गावात सर्वात मोठे गाव बिदाल आहे. गावातील ग्रमसभेची सिने अभिनेता, वॉटर कपचा ब्रँडअ?ॅम्बिसेडर अमिर खान लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी दि. ९ एप्रील रोजी बिदाल गावात येत आहे. अशी माहिती समन्वय समितीने दिली आहे. राज्यात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बिदाल गावाची ख्याती असल्याने अमिर खान याच्या उपस्थितीने बिदाल पून्हा चर्चेत येणार आहे. (प्रतिनिधी)

पहिल्या दिवशी ३० हजार जण श्रमदानासाठी उतरणार...माण तालुक्यातील श्रमदानासाठी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी किमान २५ ते ३० हजार लोक एकावेळी उतरतील असा अंदाज आहे. सेलीब्रेटी, डॉक्टर, वकील शिक्षक, ग्रामसेवक, स्वातंत्र्य सैनिक, महिला बचत गट, इंजिनिअर, युवक मंडळे यांच्यासह मुंबई-पुणेकर मंडळी, नोकरदार वर्ग या दिवशी उपस्थित रहाणार आहे. या लोकांची व्यवस्था, त्यांना लागणारी यंत्रसामर्गी, कामाचे वर्गीकरण याचे नियोजन सुरु आहे. प्रत्येक गावाने दुष्काळमुक्त व्हायचंच यासाठी चंग बांधला आहे. शिवारफेरीच्या माध्यमातून संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे. कामाची रोजची माहिती मिळावी, सहभाग वाढावा यासाठी वाड्यावस्त्यावर जाऊन माहिती दिली जात आहे. गावामध्ये संपर्क कार्यालय सुरु केले आहे.