शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बोरिंग मशीनमध्ये सापडल्याने कामगाराच्या शरीराचे झाले तुकडे, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Updated: July 18, 2023 15:26 IST

मृत तरुण उत्तर प्रदेशचा रहिवासी

सातारा : महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावर काम सुरू असताना बोरिंग मशीनमध्ये सापडून एका तरुण कामगाराच्या शरीराचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली. करुणेश कुमार (वय २९, रा. अतीत, ता. सातारा, मूळ रा. खरचाैली महाराज गंज उत्तर प्रदेश) असे मशीनमध्ये सापडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महामार्गालगत खेड फाट्यावर गॅस पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. करुणेश कुमार हा पोकलेन ऑपरेटर म्हणून त्या ठिकाणी कामाला होता. बोरिंग मशीनद्वारे खड्डा खणल्यानंतर तो खड्डा पाहण्यासाठी खाली उतरला होता. त्यावेळी तोल जाऊन त्या खड्ड्यात तो पडला. मात्र, तो खड्ड्यात पडल्याचे कोणाला दिसले नाही. ज्या खड्ड्यात तो पडला होता. तो खड्डा पुन्हा आणखी खोल खणण्यासाठी बोरिंग मशीन सुरू करण्यात आली. त्यामुळे त्याच्या शरीराचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. मात्र, ही घटना त्याच रात्री उशिरा उघडकीस आली. यानंतर कामगारांनी करुणेश कुमारच्या शरीराचा एक-एक तुकडा खड्ड्यातून बाहेर काढला. हा प्रकार नेमका कोणाच्या हलगर्जीपणामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. करुणेश कुमारच्या मृतदेहाचे तुकडे जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशहून त्याचे नातेवाइक साताऱ्यात पोहोचले असून, नातेवाइकांनी अद्याप त्याचा मृतदेह ताब्यात घेतला नाही. या घटनेला कोण जबाबदार आहे, याबाबत संबंधित कंपनी आणि नातेवाइकांमध्ये चर्चा सुरू आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार धनाजी यादव हे अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसर