शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

सातारा पालिकेतील मुकादमाच्या डोक्यात घातले फावडे, आर्थिक कारणावरून सफाई कर्मचाऱ्याकडूनच मारहाण 

By सचिन काकडे | Updated: January 11, 2024 19:16 IST

सातारा : उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परज येथे मुकादमाच्या डोक्यात फावडे ...

सातारा : उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात सातारा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने गुरुवार परज येथे मुकादमाच्या डोक्यात फावडे घालून त्यांना गंभीर जखमी केले.  संतोष खुडे (वय ४३, रा. ढोणे कॉलनी, रामाचा गोट) असे जखमी मुकादमाचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.याप्रकरणी सतीश मारुती जाधव (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता खुडे हे गुरुवार परज येथे कामावर हजर राहून सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेत होते. त्यावेळी सतीश जाधव याने तेथे येऊन 'माझे उसने घेतले आहे. साडेसात हजार रुपये परत दे, नाहीतर तुला बघून घेईल,' असा दम दिला. तसेच रागाच्या भरात शिवीगाळ करत दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या हातातील फावडे घेऊन त्यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला. यामध्ये खुडे गंभीर जखमी झाले. दोघांच्या झटापटीमध्ये इतर सफाई कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. जाधव रागाच्या भरात शिवीगाळ करत तेथून निघून गेला. खुडे यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यामध्ये जाधव याच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर