शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कोयनेच्या आपात्कालीन झडपेतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा जलाशय, वीजगृहाला धोका नाही!

By दीपक शिंदे | Updated: November 8, 2022 20:30 IST

कोयना जलविद्युत टप्पा: सर्ज विहिरीची लवकरच दुरुस्ती करण्याची आवश्यकता

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: कोयना जलविद्युत टप्पा क्र. १ व २ च्या आपत्कालीन झडप भुयार येथील भिंतीमधून व छतामधून पाण्याची गळती होत आहे. मात्र, यामुळे घाबरून न जाता ही गळती बोगद्याच्या सर्ज वेलला तडे गेल्यामुळे होत असून त्यामुळे घाबरून जाऊ नये. यामुळे धरणाच्या जलाशय, वीजगृह किंवा डोंगराला कोणताही धोका नसल्याची माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दीपक मोडक यांनी दिली आहे.

मोडक यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याकरिता विद्युत निर्मितीसाठी जे पाणी नवजा टॉवरमधून अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेलमार्गे निघते त्या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्ज वेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जातं. ही सर्ज वेल १९६० साली बांधून पूर्ण झाली असून ती कातळात १०० मीटर खोल आणि २२ ते २५ मीटर व्यास असलेली आहे. त्याला अर्ध्या मीटर रुंदीचं काँक्रीट अस्तरीकरण केलेलं आहे. ही विहीर गेली साठ वर्षं तिथे असून तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत. मात्र, आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्ज वेल मधून हे झिरपलेलं पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वारे भुयारामध्ये जातं आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडतं.या पाण्याचा वीजगृहाला, जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही. दुरुस्तीसाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागेल. सद्यस्थितीमध्ये ही गळतीचे अण्वेषण झालेले असून यासाठी गळती बंद करण्याची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सध्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याठिकाणी जाऊन दुरुस्ती करता येणार नाही. मात्र, उन्हाळ्यात महाजनको आणि जलसंपदा विभागाने ही दुरुस्ती करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली आहे.

डोंगरातून ३ घनफूट प्रति सेकंद वाहते पाणी- सर्ज वेलला तडे गेल्याने त्यातून झिरपलेले पाणी हे डोंगरातून बाहेर पडत आहे. हे पाणी ३ घनफूट प्रति सेकंद वेगाने बाहेर पडत असून त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ही गळती ६० वर्षांनंतर समोर आली आहे. त्यामुळे ती दुरुस्त करण्यात आल्यानंतर पाणी बंद होईल, असा विश्वासही मोडक यांनी व्यक्त केला आहे.