शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

देशाला अभिमान वाटेल असे साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार - उदयनराजे भोसले 

By सचिन काकडे | Updated: October 18, 2023 17:25 IST

साताऱ्यात स्मारक समितीची बैठक 

सातारा : राजधानी साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक देशाला अभिमान वाटेल असे असेल. स्मारकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा असणार आहेच, तथापि स्मारक परिसरात संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि गुणवैशिष्ट्यांची म्युरल्स उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.समितीची बैठक जलमंदिर पॅलेस येथे पार पडली. या बैठकीत उदयनराजे यांनी प्रस्तावित स्मारकाच्या कामांचा सर्वकष आढावा घेतला. खा. उदयनराजे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा आणि स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. स्मारकाचे आराखडे, संकल्पचित्रे या बाबत पालिकेने निविदा आणि अन्य स्पर्धात्मक किंवा प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवून, विशेष काळजीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केल्या. प्रस्तावित स्मारक व त्याभोवतालचा परिसराबाबत नागरिकांनी आणि विशेष करुन इतिहासतज्ञांनी जरुर त्या सूचना कराव्यात. स्मारक समितीच्या बैठकीत आलेल्या सूचनांचा योग्य तो आदर राखला जाईल.बैठकीस स्मारक समितीचे उपाध्यक्ष हरिष पाटणे, सचिव विलास शिंदे, विनोद कुलकर्णी, शरद काटकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, अमित कुलकर्णी, किशोर शिंदे यांच्यासह  समितीचे सदस्य उपस्थित होते.

गोल बागेतील पुतळ्याबाबतही चर्चा..छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांचा राजवाडा येथील पालिकेच्या गोल बागेतील (जवाहर बाग) पुतळा हा शरणार्थी भूमीकेचा आहे. त्यामुळे तो बदलण्यात यावा अशा तक्रार वजा सूचना अनेक इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या पराक्रमाला आणि समाजहितैशी भूमीकेला साजेसा ठरेल, असा पुतळा त्याठिकाणी उभारण्याबाबत समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. समितीच्या सदस्यांनी पहाणी करुन, तातडीने पुतळा बदलण्याकामी पालिकेला योग्य तो प्रस्ताव द्यावा, असा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले