शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे... धावत्या दुचाकीवर बिबट्याने घेतली झेप!, दुचाकीस्वार गंभीर जखमी

By संजय पाटील | Updated: November 5, 2022 11:59 IST

बिबट्याने भीतीने घटनास्थळावरून धूम ठोकली

कऱ्हाड : तालुक्यातील तुळसण येथे काल, शुक्रवारी रात्री उशिरा धावत्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेतली. त्यामुळे दुचाकीस्वार नाल्यात पडून गंभीर जखमी झाला. नागनाथ भोमाजी गंडे (रा. अहमदनगर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेनंतर बिबट्यानेही तेथून धूम ठोकली. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील ग्रामस्थांना त्यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुळसण येथे नागनाथ गंडे हे ऊसतोड मजूर शुक्रवारी रात्री उशिरा दुचाकीवरून निघाले होते. यावेळी धावत्या दुचाकीवर अचानक बिबट्याने झेप घेतली. त्यामुळे नागनाथ गंडे यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते दुचाकीसह नाल्यात जाऊन कोसळले. बिबट्याही गाडीसोबत नाल्यात गेला. परंतु बिबट्याने भीतीने घटनास्थळावरून धूम ठोकली. या घटनेत नागनाथ गंडे यांच्या पायाला जखम झाली. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेऊन त्यांना उपचारार्थ उंडाळेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.वन अधिकारी तुषार नवले, कोळेचे वनपाल बाबुराव कदम, म्हासोली वनरक्षक सुभाष गुरव, कासारशिरंबे वनरक्षक सचिन खंडागळे, वनसेवक हणमंत कोळी, वैभव शेवाळे, तानाजी कोळी आदींनी जखमी ऊसतोड मजुराची विचारपूस केली. घटनास्थळाचीही पाहणी केली. तुळसण येथे असलेल्या ऊसतोड मजूराच्या कुटुंबाना काळजी घेण्याचे आवाहन केले. गावातील ग्रामस्थ व शेतकरी यांनीही बिबट्या असल्याने सावधानता बाळगावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी केले आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्या