शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लेकीच्या लग्नात डीजेमुळे आई झाली कर्णबधिर, सातारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By प्रगती पाटील | Updated: August 22, 2024 11:47 IST

शिराळा तालुक्यात नागपंचमीला आठ जण कर्णबधिर

प्रगती जाधव-पाटील

सातारा : गणपती मिरवणुकीत डीजेचा दणदणाट आणि त्यावर थिरकणाऱ्या तरुणाईला पाहणे आता नित्याचे झाले आहे. पण, डीजेतून बाहेर येणाऱ्या ध्वनीलहरी कानावर आदळून कर्णबधिरत्व येत असल्याची धक्कादायक उदाहरणे सातारा आणि सांगली जिल्ह्यांत घडली आहेत.कोरेगाव तालुक्यातील एका गावात लेकीच्या लग्नात वाजणाऱ्या डीजेमुळे चक्क तिच्या आईला कर्णबधिरत्व आले आहे, तर सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात नागपंचमीच्या मिरवणुकीत तब्बल आठ युवकांनाही कर्णबधिरत्व आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.मिरवणूक म्हटले की, ध्वनिक्षेपकाच्या भिंतींवर चढून नाचण्याची झिंग तरुणाई अनुभवते. मात्र, अनेकांना मिरवणुकीत डोके दुखणे, मळमळ, रक्तदाब वाढणे, चक्कर येणे यासह कर्णबधिरत्व होण्याच्या त्रासालाही सामोरे जावे लागते. आवाजाची सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली पातळी हे या त्रासामागचे मुख्य कारण आहे. ध्वनिवर्धकांच्या भिंती उभ्या करून त्याच्यासमोर नाचणारे कार्यकर्तेही मिरवणुकीनंतर कानात दडे बसल्याचेच अनुभवत आहेत.नागपंचमीतील अतिउत्साहाने कर्णबधिरत्वसांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमीचा उत्सव जोरकसपणे साजरा केला जातो. राज्यभरातून नागपंचमीचा उत्सव पाहण्यासाठी भक्तांची गर्दी झालेली असते. यंदा एकाच गावात तब्बल ८० डीजे लावले हाेते. मद्याच्या धुंदीत असणाऱ्या तरुणाईने तेथे बेफाम नृत्य केले; पण मिरवणूक संपल्यानंतर यातील काही युवांना ‘रिंगिंग इअर’ अर्थात कानात आवाज येण्याचा त्रास जाणवू लागला. यातील काहींनी स्थानिक उपचार घेतले. पण आठ तरुणांना मात्र काहीच ऐकू येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कऱ्हाड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या तरुणांचे पडदे शाबूत आहेत; मात्र डीजेच्या ध्वनीलहरींमुळे कानांच्या नसांना त्रास झाला असून ते पूर्णपणे कर्णबधिर झाले आहेत.

  • माणूस सामान्य आवाजात बोलतो त्याची पातळी ४५ ते ६० डेसिबलपर्यंत
  • वाहने किंवा काही यंत्रांचा आवाज हा ५५ ते ७० डेसिबलपर्यंत
  • कारखान्यातील आवाज हा ८० ते १०० डेसिबल
  • डॉल्बीचा आवाज ११० डेसिबल व अधिक

मोठ्या आवाजाच्या या समस्यामोठ्या आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम किंवा ऐकण्याच्या समस्या आणि मानसिक किंवा इतर शारीरिक परिणाम असे दोन भाग आहेत. ऐकण्याच्या समस्यांचा विचार केला तर तात्पुरते कमी ऐकू येणे किंवा अगदी कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. मिरवणुकीमध्ये जाणवत नाही, मात्र त्यानंतर काही वेळाने ऐकू कमी येत असल्याचे किंवा दडे बसल्याचे जाणवते. हा परिणाम दोन-तीन दिवस राहू शकतो. त्यानंतर हळूहळू त्याचा परिणाम कमी होतो आणि ऐकू येऊ शकते. मात्र, काहीवेळा मोठ्या आवाजामुळे कानाचा पडदा, नसा यांवर गंभीर आघात होतात आणि परिणामी कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. रक्तदाब वाढणे, डोकेदुखी, छातीत धडधडणे असेही त्रास होतात.

प्रत्येकाच्या कानाची क्षमता भिन्न असते. डीजेच्या ध्वनीलहरी कानांच्या नसांवर परिणाम करत आहेत. त्यामुळे पडदा शाबूत असला तरीही अजिबात ऐकू न येणे हा त्रास रुग्णांना जाणवतो. मिरवणूक मार्गावरून गाडीतून जाणाऱ्या अवघ्या साडेपाच महिन्यांच्या लेकरालाही डीजेच्या आवाजाने बहिरेपण आले होते. वेळीच बाळावर उपचार झाल्याने त्याच्यावर उपचार करणे शक्य झाले. - डाॅ. संदीप आठवले, कान, नाक, घसा तज्ज्ञ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरkoregaon-acकोरेगाव