शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली, ९२५ लोक बाधित; रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 14:03 IST

कोरोना रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के इतका. रुग्ण वाढ ही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय बनली आहे. 

सातारा : जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आज, गुरुवारी ९२५ लोक बाधित आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे तिसऱ्या लाटेची भिती वाढली आहे.आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला आहे. जेवढ्या जास्तीत जास्त कोरोना चाचण्या केल्या तर लवकरात लवकर रुग्ण सापडतील आणि त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करून त्यांना कोरोना मुक्त करता येईल, असे प्रयत्न आरोग्य यंत्रणेने सुरू ठेवले आहेत. बुधवारी ५ हजार १२२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्या चाचण्यांमधून ९२५ कोरोना बाधित आढळून आले आहेत.कोरोनाचा रुग्ण वाढीचा दर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सलगपणे रुग्ण वाढीचा दर हा पंधरा टक्क्यांच्या वर आहे. तर गुरुवारी तब्बल १८.०६ टक्के इतका कोरोना रुग्ण वाढीचा दर वाढला. रुग्ण वाढ ही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरलेली आहे. 

जिल्हा प्रशासनाने लोकांच्या लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वय वर्ष १५ ते १८ या वयोगटात असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना लसींचा डोस दिला जातोय. याबरोबरच ज्येष्ठांना १०० टक्के लसीकरण करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू ठेवले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी ज्यांचे लसीचे दोन डोस झालेले आहेत, त्यांना त्रास कमी होणार आहे, हे अभ्यासांती स्पष्ट झालेले आहे. 

मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या महानगरांमध्ये रुग्ण वाढ झाली, मात्र ज्यांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे, अशा लोकांना कमी त्रास झाला; परंतु ज्यांनी लसीकरण केले नाही अशा ९६ टक्के लोकांना ऑक्सिजन बेड शिवाय पर्याय नव्हता. या परिस्थितीमध्ये जीव वाचवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय ठरणार आहे.प्रशासकीय यंत्रणा सज्जकोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने आरोग्य सेवा सज्ज ठेवलेली आहे. अद्यापही गृह विलगीकरण तसेच संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासनाच्या कोविड सेंटर्समध्ये अद्याप व्याधीग्रस्त रुग्ण दाखल झालेले नाहीत. मात्र रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड सज्ज ठेवावे लागणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या