सातारा : सातारा, जावळी-महाबळेश्वर बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. जावळीत ९१.३३, तर साताऱ्यात ९० टक्के मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.सातारा बाजार समितीच्या ११ जागांसाठी हे मतदान घेण्यात आले. शासकीय तंत्रनिकेतन सातारा, वडूथ, वर्ये, परळी, शेंद्रे, नागठाणे, तासगाव येथे सकाळी ८ ते ४ यावेळेत मतदान झाले.जावळी-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ जागांसाठी मतदान घेण्यात आले. दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत १७ केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. सकाळच्या टप्प्यात मतदारांनी पाठ फिरविली होती. मात्र, दुपारनंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात रविवारी कोठेच पाऊस न झाल्याने मतदान सुरळीत पार पडले. दोन्ही ठिकाणी आज, सोमवारी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीवेळी अप्रिय घटना घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवणार आहे. (प्रतिनिधी)
जावळीत ९१, तर साताऱ्यात ९० टक्के मतदान
By admin | Updated: August 10, 2015 00:05 IST