शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात ८५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:08 IST

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : राज्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गतवर्षीपेक्षा चालू हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साखर उत्पादन होत आहे. गतवर्षी १३ फेब्रुवारीअखेर सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये ५८ लाख ५० हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६७ लाख ४८ हजार ३२५ क्विंटल साखर ...

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : राज्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गतवर्षीपेक्षा चालू हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साखर उत्पादन होत आहे. गतवर्षी १३ फेब्रुवारीअखेर सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये ५८ लाख ५० हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६७ लाख ४८ हजार ३२५ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. तर चालूवर्षी ८ मार्चअखेर ८३ लाख ८३ हजार ८२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू हंगामात किमान ३५ ते ४० लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन होईल, असा अंदाज कारखानदारांकडून वर्तवला जात आहे. पुढील हंगामात आजपर्यंतच्या गाळप हंगामाचा उच्चांक निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीप हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यामध्ये सर्वाधिक गाळप सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने केले आहे. तर साखर उत्पादनातही सह्याद्री सहकारी साखर कारखाना आघाडीवर राहिला आहे. या पाठोपाठ कृष्णा साखर कारखाना दुसºया स्थानावर आहे. मात्र, सह्याद्रीपेक्षा कृष्णा साखर कारखान्याचा उतारा मात्र अधिक आहे.एका बाजूला साखरेचे उत्पादन वाढत असले साखरेच्या दरात अजून तरी म्हणावी अशी वाढ होत नसल्याने व कारखान्यात तयार होणाºया इतर उपप्रकल्पांनाही दर नसल्याने गाळप झालेल्या उसाचे बिल वेळेत देण्याबाबत कारखानदार उदासीन आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.चालू हंगामाचा शेवट २५ ते ३० एप्रिलपर्यंत होणार असल्याने अजून किमान ५५ दिवस चालणाºया जिल्ह्याच्या गाळप हंगामात प्रतिदिन ५१ हजार ४५० क्षमतेनुसार सर्व कारखाने सुरू राहिले तर किमान २८ लाख क्विंटल साखर उत्पादन वाढू शकेल. मात्र, वाढता उन्हाळा आणि शिल्लक ऊस उत्पादन लक्षात घेता १० ते १५ लाख क्विंटल असे उत्पादन शक्य आहे. गतवर्षी ६७ लाख ४८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते.या हंगामात गतवर्षी पेक्षा सरासरी २० टक्के अधिकसाखर उत्पादन झाले असले तरी पुढील हंगामात चालू हंगामापेक्षा अधिक ऊस उपलब्ध असल्याने जिल्ह्यात साखर उत्पादनाचाउच्चांक प्रस्थापित होईल, अशीआशा कारखानदार व्यक्त करीत आहेत.कारखान्याचे नाव साखर उत्पादन (क्विंटल)मध्ये२०१६/१७ १७/१८ (८ मार्चअखेर)श्रीराम.फलटण(जवाहर) ३,४५,१०० ४,१०,८५०कृष्णा ८,६१,९५० १०,९९,१८०किसन वीर, भुर्इंज ४,७८,८९० ६,०४,४७०लो.बा. देसाई १,८४,१७५ २,१५,७००सह्याद्री ९,७४,५३० ११,९४,६७०अजिक्यंतारा ४,५७,८८० ५,५९,२३०रयत ३,३८,८३० ४,०७,६१०खंडाळा तालुका १,९४,६५० २,५१,६००कारखान्याचे नाव साखर उत्पादन (क्विंटल)मध्ये२०१६/१७ १७/१८ (८ मार्चअखेर)न्यू फलटण २,७३,६०० ३,०१,९००जरंडेश्वर ६,३८,४०० ८,७४,३८०जयवंत शुगर ५,१४,६०० ६,३२,१५०ग्रीन पॉवर ४,६६,५९० ५,७१,१९०स्वराज ३,७१,९३० ४,९१,०४०शरयू ६,४७,२०० ७,९६,१५०एकूण ६७,४८,३२५ ८३,८३,१२०