शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

साताऱ्यात वाळू माफियांची ८० वाहने जप्त, ४.४१ कोटींचा दंड; खनिकर्म विभागाची कारवाई 

By दीपक शिंदे | Updated: March 11, 2024 15:20 IST

अवैध उत्खननाची १८४ प्रकरणे उघड

सातारा : अवैध वाळू उपसा करून कोट्यवधी रुपये झटपट कमवण्याच्या इच्छेने अनेकजण वाळू तस्करीकडे वळत आहेत. या वाळू माफियांवर जिल्हा गौण खनिज विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असते. अनेक पोलिस ठाण्यांत वाळू तस्करांवर गुन्हेदेखील दाखल झाले आहेत व वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत.सातारा जिल्ह्यात १ एप्रिल ते १ मार्च या कालावधीत अवैध वाळू व उत्खननाची १८४ प्रकरणे उघड झाली त्यात वाळू, मुरूम, माती, दगड या प्रकारची गौण खनिजे असून त्यात ४ कोटी ४१ लाख ८१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.४.४१ कोटींचा दंडसातारा जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ ते १ मार्च २०२४ पर्यंत अवैध उत्खनन व वाहतुकीच्या १८४ प्रकरणात ४.४१ कोटी रुपये दंड आकारला आहे. त्यापैकी १ कोटी ८६ लाख ४९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय सहाजणांवर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.तस्करी करणारी वाहने जप्तअवैध रेतीची तस्करी करताना गौण खनिज विभागाकडून वाहने जप्त करण्यात येतात. जिल्हा खनिकर्म विभागाकडून आतापर्यंत ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत.अनेकदा बरेच दिवस ती वाहने संबंधित पोलिस स्टेशन हद्दीत जमा असतात तर काही तहसील कार्यालयांच्या आवारात पडून असतात.

लिलाव करून पैसे वसूल करणाररेती तस्करी करणारे अनेक वेळा जुन्या वाहनांचा वापर करतात. त्यामुळे प्रशासनाने एखादे वेळी वाहने जप्त केल्यास वाहन मालकांचे फारसे नुकसान होत नाही. त्यामुळे अनेकदा जप्त करण्यात आलेले वाहन सोडविण्याच्या भानगडीत वाहन मालक पडत नाहीत. मात्र, विनाकारण जागा अडकून पडते. या कार्यालयांच्या आवारात सध्या जागा अपुरी पडत आहे.

जिल्ह्यात अवैध गौण खनिजाचा उपसा रोखण्यासाठी सातत्याने कारवाई करण्यात येत असून भरारी पथकाद्वारे संबंधित ठिकाणी पाहणी करण्यात येते. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. - अमोल थोरात, जिल्हा खनिकर्म अधिकारी, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर