शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘सह्याद्री’साठी ७७ टक्के मतदान

By admin | Updated: March 18, 2015 00:07 IST

अनेकांनी बजाविला हक्क : मतमोजणी दिवशी वाहतुकीत तात्पुरता बदल

कऱ्हाड : यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. कार्यक्षेत्रातील ९९ मतदान केंद्रांवर सरासरी ७७.८ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.कऱ्हाड, सातारा, कोरेगाव, खटाव हे सातारा जिल्ह्यातील चार तालुके व सांगली जिल्ह्यातील कडेगाव हा तालुका सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो. सह्याद्रीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यापासुन कार्यक्षेत्रात प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. मंगळवारी २१ जागांसाठी कार्यक्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडली. मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पाच तालुक्यातील ९९ मतदान केंद्रावर सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एका मतदाराला २१ मते द्यावी लागल्याने मतदान प्रक्रीयेसाठी वेळ लागला. कऱ्हाडसह, तांबवे, करवडी, म्होप्रे, बेलवडे, तासवडे, उंब्रज, कोर्टी, कोपर्डे हवेली, तळबीड, चचेगाव, ओगलेवाडी, पार्ले, पुसेसावळी, तारगाव, वाठार किरोली, साप, रहिमतपूर आदी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता मतदान केंद्रांवरील मतपेट्या सिल करून कऱ्हाड येथील भेदा चौकातील गोडाऊनमध्ये आणण्यात आल्या. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, ४९५ मतदान अधिकारी, ९९ मतदान कर्मचारी असे एकुण ६९३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.कोपर्डे हवेली मतदान केंद्रावर १ हजार १५७ पैकी ९९८ (८६.२५ टक्के ), वडोली निळेश्वर येथे ३८० पैकी २६६ (९० टक्के), पार्ले (९३ टक्के), नडशी येथे ३६२ पैकी ३३४ तर शिरवडे येथे ८२ टक्के, तसेच तांबवे मतदान केंद्रावर १ हजार ५७७ पैकी ११५२ (७३ टक्के), म्होप्रेत ३६९ पैकी २५८ (७० टक्के), बेलदरे येथे २९१ पैकी १८३ (६३ टक्के), वस्ती साकुर्डी ३१७ पैकी २३१ (७२.६४ टक्के), वसंतगड ४५७ पैकी ३३२ (७२.६६ टक्के) आदी मतदान झाले. (प्रतिनिधी)कऱ्हाडात गुरुवारी मतमोजणकऱ्हाड येथे भेदा चौकातील शासकिय गोडाऊनमध्ये उद्या (गुरूवार) मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असुन गोडाऊन परीसरात दोन्ही पॅनेलच्या समर्थकांना थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीमुळे गुरूवारी शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.