शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

७६ जीव घेणारे वळण होणार सरळ : खंबाटकीतील ‘एस’ वळण होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:58 IST

गेल्या दहा वर्षांत तब्बल ७६ जणांचे प्राण घेणारे व २८१ जणांना जखमी करणारे खंबाटकी घाटातील धोकादायक ‘एस’ वळण आता सरळ होणार आहे. दोन नवीन बोगदे व महामार्ग रुंदीकरणात हे वळण निघणार

ठळक मुद्दे‘लोकमत’मधून पाठपुरावा ; जुन्या टोलनाक्यावळ होणार उड्डाणपूल

मुराद पटेल।शिरवळ : गेल्या दहा वर्षांत तब्बल ७६ जणांचे प्राण घेणारे व २८१ जणांना जखमी करणारे खंबाटकी घाटातील धोकादायक ‘एस’ वळण आता सरळ होणार आहे. दोन नवीन बोगदे व महामार्ग रुंदीकरणात हे वळण निघणार असून, धोकादायक वळणावरील अपघातांच्या मालिकेला आता पूर्णविराम मिळणार आहे.

खंबाटकी बोगद्याच्या निर्मितीनंतर घाटाच्या वळणावर ‘एस’ प्रकारचे वळण दिल्याने याठिकाणी अपघाताचे ग्रहण लागत अपघातांची मालिका घडू लागल्याने पोलीस प्रशासनाकडून खंबाटकी घाटातील एस वळणला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले होते. याठिकाणी होणाऱ्या अपघाताची संख्या व मृत्यूचे प्रमाण पाहता संबंधित एस वळण काढण्याची मागणी प्रवासी, वाहतूकदार व प्रशासनाकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे करण्यात येत होती. याबाबत कायम नागरिकांच्या मागणीला ‘लोकमत’ने सातत्याने सचित्र वृत्त देत नागरिकांच्या मागण्यांचा पाठपुरावा राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे केला आहे.

खंबाटकी घाटात दोन नवीन अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त बोगदे निर्माण करत असताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कर्दनकाळ ठरलेल्या एस वळण काढण्याला प्राधान्य दिले आहे. यामध्ये खंबाटकी घाटातील बोगद्यांमधून बाहेर पडल्यानंतर दिलेले वळण सरळ करत आताच्या महामार्गामध्ये रुंदीकरण करताना ‘एस’ वळण काढत एस कॉर्नरच्या काही अंतरावरून रस्ता सरळ करत खंबाटकी घाटातील जुन्या टोलनाक्यापर्यंत महामार्ग तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जुन्या टोलनाक्याजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलाची निर्मिती करणार आहे.अपघातानंतर तत्काळ आपत्कालीन सेवाखंबाटकी घाटामध्ये निर्माण करण्यात येणाºया बोगद्यांमध्ये अपघात घडल्यास अत्याधुनिक सुविधांमुळे त्याचठिकाणी लगेच कार्यान्वित करण्यात येणाºया आपत्कालीन व्यवस्थेला माहिती मिळत अपघातग्रस्तांना मदत तत्काळ उपलब्ध होणार आहे. याकरिता याठिकाणी दोन नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. 

खंबाटकी घाटात अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ‘एस’ वळण काढण्याला व महामार्ग सरळ करण्याला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्राधान्य दिले आहे. याठिकाणी उड्डाणपूल व दरी, पुलाची निर्मिती करण्यात येत असल्याने या ठिकाणावरून वाहतूक सुरळीत होऊन प्रवाशांचा प्रवास हा सुरक्षित व सुखकर होण्यास मदत होणार आहे.- श्रीकांत पोतदार, उपमहाव्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा