शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: रहिमतपूर नगरपरिषदेचे ७० मिळकतदार सुमारे दोन कोटींचे थकबाकीदार, वसुलीचे आव्हान

By दीपक शिंदे | Updated: March 13, 2023 18:01 IST

शासन पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान रोखणार...

जयदीप जाधवरहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषदेचे ७० मिळकतदार सुमारे दोन कोटी रुपयांचे थकबाकीदार आहेत. यामधील दीड कोटी रुपये गेल्या दोन वर्षांपासून अडकले असून, तब्बल दहा वर्षांपासून ५० लाख रुपये मिळकतदारांनी लटकवले आहेत. कारवाईचा धाक दाखवूनही मिळकतदार जुमानत नसल्याने थकीत कर वसुलीसाठी पालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.रहिमतपूर नगरपरिषदेचे सुमारे अडीच हजार मिळकतदार आहेत. यामध्ये व्यावसायिक व घरगुती मिळकतदारांचा समावेश आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका प्रशासनाने गेल्या महिन्यापासून आक्रमक धोरण पत्करले आहे. अनेक मिळकतदारांना वसुलीसाठी नोटिसा बजावून मुदतीत कर भरणा न केल्यास व्यावसायिक मिळकतीला सील ठोकणे व जप्ती करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अनेक मिळकतदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. पालिकेकडून होत असलेल्या कारवाईमुळे काही थकबाकीदारासह नियमित कर भरणाऱ्या मिळकतदारांनी कर भरल्यामुळे पालिकेची कर वसुली आजअखेर साठ टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. मार्च एंडसाठी केवळ १५ दिवसांचा अवधी शिल्लक असून ४० टक्के कर वसुली अद्याप बाकी आहे. ‘संडे हो या मंडे’ पालिकेची वसुली पथके मिळकतदारांच्या घरोघरी व व्यावसायिकांच्या गाळ्याला भेटी देऊन कर वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत. परंतु बाहेरील हस्तक्षेपामुळे व्यावसायिक मिळकतींना सील ठोकण्याच्या पालिकेच्या कारवाईला लगाम बसल्याची चर्चा आहे. पालिकेच्या कारवाई मोहिमेत कोणीही हस्तक्षेप न केल्यास ३१ मार्च पूर्वीच शंभर टक्के वसुली करण्याची क्षमता पालिका प्रशासनात असल्याची चर्चा नागरिकांच्यात सुरू आहे.शासन पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान रोखणार...ज्या नगरपरिषदा दरवर्षी ८० टक्क्यांपेक्षा कमी कर वसुली करतील अशा नगरपरिषदांचे १५ व्या वित्त आयोगाचे अनुदान रोखण्यात येणार असल्याचा इशारा शासनाने दिलेला आहे. पालिकेला पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून दरवर्षी शासनाकडून अडीच कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षात १२ कोटी ५० लाख रुपये मिळणार आहेत. परंतु कर वसुली कमी झाल्यास या अनुदानाला पालिका प्रशासनाला मुकावे लागणार आहे. मिळकतदारांनी तातडीने कर भरणा करून पालिका प्रशासनात सहकार्य करावे, असे आवाहन रहिमतपूर पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक संजीवनी दळवी यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर