शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

कोयनेत ७ टीएमसी पाणीसाठा

By admin | Updated: June 14, 2016 00:12 IST

गेल्यावर्षीपेक्षा तुलनेत चौपट पाणी कमी : जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये खडखडाट

सातारा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन दरवर्षी सरासरी ७ जूनला होते. यंदा मात्र १२ जून उजडला तरी मान्सून राज्यात आला नाही. त्यातच मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरविल्याने धरणांमध्ये खडखडाट जाणवत आहे. कोयनेत केवळ सात टीएमसी पाणी शिल्लक असून, गेल्या वर्षी याच दिवशी २५.१९ टीएमसी पाणी होते.जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण हे तालुके अती पावसाचे म्हणून ओळखले जातात. या भागांत मान्सूनचा पाऊस पडतो. यंदा राज्यातच मान्सून आलेला नसल्याने हे तालुके पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. याउलट माण, खटाव, फलटण व खंडाळा तालुक्यांचा काही भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. दुष्काळावर मात करण्यासाठी या परिसरात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यातच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुसेगाव, माण, खटाव तालुक्यांत वळवाचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे तेथील शेतकरी मशागतीच्या कामाला लागले आहेत. उर्वरित जिल्ह्यात पाऊस झालेला नसल्याने सर्वच धरणे कोरडी आहेत. सर्वाधिक पाणी कोयना धरणात ७.५३ टीएमसी असून, त्या खालोखाल उरमोडीत ३.३६ टीएमसी पाणी आहे. या दोन्ही धरणात गेल्या वर्षी आजच्या तारखेला कोयनेत २५.१९ तर उरमोडीत ६.३६ टीएमसी पाणी होते. धरणातील पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)१२ जूनचा पाणीसाठाधरण२०१६२०१५कोयना ७.५३ २५.१९धोम ०.९८१.६७ कण्हेर १.४१२.३३धोम-बलकवडी ०.५२०.२२उरमोडी ३.३६६.३६तारळे १.४३०२.४५येरळवाडी ०००.१२मोरणा ०.५८०.५८उत्तरमांड ०.२८०.३८५नागेवाडी ०.७६०.१३०महू ०.०९३०.०४६हातगेघर ०.०४२००.०२८ वीज निर्मितीवर प्रश्नचिन्हदरवर्षीपेक्षा यंदा लवकर व मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल असे भाकीत वेदशाळेने वर्तविले होते. त्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, ७ जूनला येणारा मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवरच खोळंबला आहे. १३ जूननंतरही पाऊस पडलेला नसल्याने ही परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर धरणांमधील वीज निर्मिती कशी होणार असा प्रश्न सातारकरांमधून विचारला जात आहे.