शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातल्या रस्त्यांसाठी ७ हजार कोटी!

By admin | Updated: March 27, 2016 00:16 IST

१६५ किलोमीटरचे भाग्य उजळणार : म्हसवड-सातारासह पालखी मार्गाचाही समावेश

सातारा : केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने २६ हजार ८६८ कोटी खर्चाच्या रस्ता विकासकामाचे उद्घाटन सोलापूरमध्ये शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा सोहळा सोलापूरमध्ये होत असला तरी यामुळे सातारा जिल्ह्यातील १६५ किलोमीटरच्या रस्त्याचे भाग्य उजळणार असून जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पंढरपूर-फलटण-आळंदी पालखी मार्गाचाही समावेश आहे. कोणत्याही भागाचा विकास व्हायचा असेल त्या भागातील दळणवळणाची सोय महत्त्वपूर्ण असते. कृष्णा-कोयना काठचा सुजलाम्-सुफलाम् भूप्रदेश, अनेक धरणे लाभलेला सातारा जिल्हा साखरपट्टा म्हणून नावारूपास आला. मुबलक पाण्यामुळे शिरवळ, लोणंद, सातारा, कऱ्हाड येथील औद्योगिक वसाहतींचा झपाट्याने विकास झाला. सातारा जिल्ह्यातून गेलेल्या सुमारे १४० किलोमीटरच्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळण सुधारलेले असतानाच या मार्गावरील पुणे ते शेंद्रे दरम्यानच्या सहापदरीकरण्याचे काम सुरू झाले आहे. पुणे-कोल्हापूर या मार्गावरील रस्त्याची चांगली अवस्था असतानाच पूर्वेकडील फलटण, माण, खटाव तालुक्यांतील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती होणे गरजेचे होते. केंद्र शासनाने तत्त्वत: मंजूर केलेल्या पंढरपूर-फलटण-आळंदी पालखी मार्गासाठी ३,७०० कोटी, म्हसवड-पिलीव-पंढरपूर मार्गासाठी १,४०० कोटी तसेच सातारा-म्हसवड-अकलूज-बार्शी-येडशी या मार्गासाठी १,९०० कोटींची तरतूद केली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यातून जाते. लोणंद शहरात आल्यानंतर तरडगाव, फलटण, विडणी, पिंप्रद, बरड मार्गे राजुरी येथे ही पालखी जाते. या रस्त्याच्या विकासासाठी १,९०० कोटींची तरतूद केली आहे. या मार्गाचे यापूर्वीच चौपदरीकरण झाले आहे. त्यातूनही लोणंद ते फलटण दरम्यानचा रस्ता सुस्थितीत असला तरी फलटण ते राजुरी दरम्यानचा रस्ता खराब असल्याने या मार्गावर वारकऱ्यांचा प्रवास खडतर असतो. नवीन कामे झाल्या माउलीच्या दर्शनाला निघालेल्या वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यास निश्चित मदत होणार आहे. याबरोबरच म्हसवड-पिलीव-पंढरपूर मार्गावर म्हसवड ते धुळदेव हा दहा ते बारा किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे. तसेच सातारा-म्हसवड-अकलूज-बार्शी-येडशी या मार्गावर सातारा ते जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या कारखेल या शंभर किलोमीटरच्या रस्त्याचे काम होणार आहे. या मार्गावर कोरेगाव, पुसेगाव, दहिवडी, गोंदवले, म्हसवड ही महत्त्वाची गावे येत आहेत. (प्रतिनिधी)