शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील शेतकऱ्यांसह प्रशासनाला दिलासा, आठवड्यात केवळ 'इतक्या' जनावरांना लम्पीची लागण

By नितीन काळेल | Updated: January 23, 2023 18:49 IST

सातारा : जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचे संकट कमी होत असून आठवड्यात फक्त ६८ पशुधनाला आजाराने गाठले. तर २१ जनावरांचा मृत्यू ...

सातारा : जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचे संकट कमी होत असून आठवड्यात फक्त ६८ पशुधनाला आजाराने गाठले. तर २१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तीन महिन्यानंतरच शेतकऱ्यांसह प्रशासनाला दिलासा मिळालाय. तर आतापर्यंत जिल्ह्यातील २० हजार पशुधन बाधित झाले असून १ हजार ४३६ चा बळी गेला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून लम्पी चर्मरोगाचा शिरकाव झाला. कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी गावात प्रथम लम्पी बाधित पशुधन आढळले होते. त्यानंतर लम्पीचा प्रसार जिल्ह्यात वाढला. पशुसंवर्धन विभागाने लम्पी संकटापासून जनावरांना वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली. नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे त्यानंतर लम्पीने बाधित होणाऱ्या जनावरांचा आकडा कमी होत गेला.जिल्ह्यातील २२९ गावांत आतापर्यंत लम्पी बाधित जनावरे आढळून आलेली आहेत. तर २० हजार १८० पशुधन बाधित झाले. त्यातील १ हजार ३६ जनावरे मृत झाली आहेत. सद्यस्थितीत दोन हजार पशुधनावर अजून उपचार सुरु आहेत. तरीही जिल्ह्यातील लम्पीचे संकट कमी झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.फलटण तालुका आघाडीवर...जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लम्पी बाधित पशुधन आहे. यामध्ये फलटण तालुक्यात सर्वाधिक होते, तर महाबळेश्वरला कमी राहिले. फलटणमधील ५ हजार ८२५ जनावरे आतापर्यंत बाधित झाली. तर ४०६ जनावरांची बळी गेला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग