शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

मुलाकडून रिक्षा शिकली, कराडमधील ६५ वर्षीय आजी सुसाट सुटली

By प्रमोद सुकरे | Updated: April 23, 2025 16:15 IST

महिन्यात शिकल्या रिक्षा 

प्रमोद सुकरेकऱ्हाड:  खरंतर वयाची पन्नाशी ओलांडली की अलीकडे लोकं थकल्यासारखे करतात. मग ६५ वय म्हणजे तर सेवानिवृत्ती नंतरचे वय मानले जाते. पण या वयातही न थकता एक आजी चक्क रिक्षा चालवायला शिकल्या आहेत. अन् गेल्या महिनाभरापासून त्या कराडात प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यांच्या या करारीपणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.कराड तालुक्यातील नांदगाव हे एक छोटेसे गाव. येथील मंगल आवळे सध्या रिक्षा व्यवसाय करीत आहेत. त्यांचे पती मुले लहान असतानाच या जगातून निघून गेले. तेव्हा त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ३ मुली, एक मुलगा यांचा सांभाळ केला. आता मुलगा मोठा होवून एस टी मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतोय‌. मुलींचीही लग्ने झाली आहेत. मुलाचा संसारही चौकोनी झाला आहे. त्या मुलाच्या संसाराला आपला हातभार लागावा. आपला बोजा कोणावर पडू नये या हेतूने त्यांनी काहीतरी करण्याचे निश्चित केले. त्यातून रिक्षा शिकून ती चालवण्याचा निर्णय घेतला. त्याला आता मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.वास्तविक दू चाकी असो वा चार चाकी असो ती चालवताना महिलांना कसरत करावी लागताना पहायला मिळते. काही महिला सरावाने सराईतपणे वाहने चालवतात पण तरीही मनात धाकधूक असतेच. मात्र नांदगाव येथील ६५ वर्षीय या आजींच्या चेहर्यावर कोणतीही भिती, धाकधूक दिसत नाही. उलट कराड शहरातील गर्दीतूनही त्यांची रिक्षा बुंगाट धावताना पहायला मिळते. या आजीची रिक्षा धावताना पाहून भल्या भल्यांच्या भुवया उंचावत आहेत.

मुलाने शिकवली आईला रिक्षा ..खरंतर आई हा प्रत्येक मुलाचा पहिला गुरु असतो. तिच्याकडूनच आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो. तसेच आई मंगल कडून घनःश्याम देखील सगळे शिकला. पण ६५ वर्षीय आई मुलगा घनःश्याम कडून रिक्षा शिकली आहे. स्वता एक ड्रायव्हर असलेल्या या मुलाने आईला नांदगाव परिसरात रिक्षा चालवण्याचे धडे दिले. आता ती सराईतपणे प्रवासी रिक्षा चालवू लागली आहे. त्यामुळे आईबरोबर मुलाचेही कौतुक होत आहे.महिन्यात शिकल्या रिक्षा मंगल आवळे यांचे सध्या वय ६५ आहे. त्याबरोबर त्यांना शुगरचा त्रासही आहे. तरी देखील महिनाभरात सरावाने त्या रिक्षा चालवायला शिकल्या आहेत. त्यांना चेष्मा मात्र लागलेला नाही. कराड मधून रिक्षा चालवताना वाहतूक कोंडीचा सामना नित्यनेमाने करावा लागतो. मात्र असे असतानाही मंगल आबा आवळे अगदी गर्दीतूनही सराईतपणे रिक्षा चालवतात त्यांच्या या धाडसाचे कौतुक झाले नाही तर नवलच.

कराड -उंडाळे या मार्गावर मी प्रवासी वाहतूक करते. माझ्या रिक्षात प्रवाशीही बिनधास्त बसतात. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत रिक्षा चालवते. गरजेनुसार दुपारची विश्रांती ही घेते. तरीदेखील खर्च वजा जाता दररोज ५००ते ७०० रुपये मला मिळतात. तसेच शिकण्याची जिद्द असेल तर वयाची अडचण येत नाही. अन मुली, महिलांनी ठरवले तर त्या कोणत्याही क्षेत्रात कामे राहणार नाहीत. - मंगल आवळे,  रिक्षा चालक 

सुरुवातीपासून कष्टात आयुष्य घालवलेल्या आमच्या आईची या वयात देखील शिकण्याची व काम करण्याची उमेद आहे. म्हणूनच तीने रिक्षा चालवायला शिकले. आता प्रवासी वाहतूक ती करते त्यातून तिला मिळत असलेला आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटते. - घनश्याम आवळे, मुलगा 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड