शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

४0 डिग्रीतही झाले ६0 टक्के मतदान; जिल्ह्यातील मतदारांनी दाखवला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क । सातारा: सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पाडले. जिल्ह्यात पारा वाढला असतानादेखील मतदारांचा उत्साह ...

लोकमत न्यूज नेटवर्क । सातारा: सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पाडले. जिल्ह्यात पारा वाढला असतानादेखील मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मंगळवारी मतदान केले. ४0 अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना सातारा मतदार संघात सरासरी ६0 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर या टक्केवारीत काहीअंशी बदल होण्याची शक्यता आहे.लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी काँगे्रसचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील तर माढ्यामध्ये भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी काँगे्रसचे संजय शिंदे यांच्यात मुख्य लढत असल्याचे चित्र होते.उमेदवारांच्या विजयासाठी पक्षांनी शक्ती पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीत पहिल्यांदाच ‘ईव्हीएम’सोबतच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करण्यात आला. काही ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड तर काही ठिकाणी ‘व्हीव्हीपॅट’च्या ‘स्लीप’ न दिसणे यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. मतदार यादीतील घोळामुळे मतदारांची तारांबळ उडाली. काही मतदार मतदानापासून वंचित राहिले.या घटनांमुळे निवडणूक यंत्रणेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. मात्र, कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे दोन्ही मतदार संघात कुठलीही अनुचित घटना घडली नाही व शांततेत मतदान पार पडले.जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारच्या सुमारास मात्र चढलेल्या पाºयाने मतदारांना घाम फोडला. ऊन कमी झाल्यानंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली.साताºयात २०१४ च्या तुलनेत सुमारे जवळपास ४ टक्के अधिक मतदान जास्त झाले. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही कमी मतदान होईल की काय, अशी चर्चा सगळीकडे होती. परंतु तरुणांनी उत्साह दाखवल्याने ही चर्चा अखेर फोल ठरली.लग्नापूर्वी पार पाडले राष्ट्रीय कर्तव्यवाई तालुक्यातील बावधन येथे राहणारे शिवराज देवराम ठोंबरे (वय २४) हे सैन्यदलात कार्यरत आहेत. मंगळवार, दि. २३ रोजी त्यांचा विवाहसोहळा कोपर्डे येथे पार पडला. विवाहाला जाण्यापूर्वी त्यांनी बावधन जिल्हा परिषद शाळेतील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. यानंतर वºहाडी मंडळींसह ते विवाह सोहळ्यासाठी कोपर्डे येथे निघून गेले. शिवराज ठोंबरे यांनी लग्नापूर्वी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मतदान हा आपला अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे गरजेचे आहे.प्रत्येक निवडणुकीत त्यांनी केले मतदान१९५२ सालापासून साताºयात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मत देऊन शहरातील ९० ते ९४ वर्षीय दाम्पत्य असलेल्या जागरुक मतदारांनी एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. पांडुरंग मारुती संकपाळ (वय ९४) व शकुंतला संकपाळ (वय ९०) दाम्पत्यानी उपनगरातील गोडोलीत मतदान केले. तसेच माण तालुक्यातील लतिका शिवराम कुलकर्णी, कºहाड तालुक्यातील हरपळवाडी येथील गुणाबाई काळभोर तर जावळी तालुक्यातील मामुर्डी येथील वेणुबाई धनवडे यांनी मतदान केले.