शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकाची ६० लाखांची फसवणूक

By दत्ता यादव | Updated: April 25, 2023 21:03 IST

पुण्यातील एकावर गुन्हा; उत्तर प्रदेशमध्ये जमीन देण्याचे आमिष

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : उत्तर प्रदेशमधील मुज्जफराबाद येथे २५ बिगा जमीन विकत देतो, असे आमिष दाखवून साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ६० लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पुण्यातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

लक्ष्मण महादेव जानराव (रा. कोंडवे, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नंदकुमार विनायक फडके (वय ५६, रा. व्यंकटपुरा पेठ, गाेखले हाैदाजवळ, सातारा) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पुण्यातील एका व्यक्तीने लक्ष्मण जानराव यांची त्यांच्याशी ओळख करून दिली होती. एकेदिवशी जानराव यांनी उत्तर प्रदेशमधील मुज्जफराबाद येथे २५ बिगा जमीन विकायची असल्याचे बांधकाम व्यावसायिक फडके यांना सांगितले. त्यानंतर ती जमीन विकत घ्यायची, असं फडके यांचं ठरलं. त्या जमिनीचा व्यवहारही तब्बल १६ कोटींवर ठरला होता. असं पोलिसांनी सांगितलं. एवढेच नव्हे तर या व्यवहारापोटी सुरुवातीला फडके यांनी जानराव यांना तब्बल ६० लाख ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्यानंतर त्यांनी जानराव यांच्याकडे जमिनीच्या व्यवहाराच्या कागदपत्रांची मागणी केली. परंतु जानराव यांनी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फडके यांना आपली फसवणूक झाल्याची शंका आली. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन जानराव यांच्या विरोधात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे अधिक तपास करीत आहेत.

आणखी तीन ते चार जणांचा समावेश

फसवणूक करणाऱ्यांमध्ये आणखी तीन ते चार जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. नेमकी कशा पद्धतीने हे टोळकं फसवणूक करत होतं. हे तपासानंतरच समोर येणार आहे. व्यवहारात दाखवलेली जमीन कागदावर आहे की वास्तव्यात आहे, हे मात्र अद्याप पोलिसांना समजले नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.      

टॅग्स :Satara areaसातारा परिसर