शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बॅंकेत बनावट सोने तारण ठेवून घेतले सहा लाख कर्ज

By दत्ता यादव | Updated: July 11, 2023 21:22 IST

मलवडीतील घटना; सराफासह चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा

सातारा : मलवडी, ता. माण येथील बँक ऑफ बडोदा शाखेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बॅंकेची ६ लाख ८९ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले असनू, याप्रकरणी एका सराफासह चाैघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात फसवुणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भैरू भगवान पाटोळे, विद्या भैरू पाटोळे (रा. निढळ, ता. खटाव), ज्ञानेश्वर जगन्नाथ जाधव (रा. तोंडले, ता. माण, जि. सातारा), सराफ व्यावसायिक विजय गोरख कुंभार (रा. मलवडी, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलवडी येथे बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. या शाखेमध्ये वरील संशयितांनी १४ सोन्याच्या पाटल्या, चार चेन अशा प्रकारचे दागिने तारण ठेवून त्याबदल्यात ६ लाख ८९ हजार रुपये कर्ज घेतले. हे दागिने बॅंकेत तारण ठेवण्यासाठी लागणारे मूल्यांकन प्रमाणपत्र सराफाने दिल्याने दागिने खरे असल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांना वाटले.

मात्र, कर्ज मुदतीत न भरल्यामुळे बॅंकेने संशयितांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची पुन्हा एकदा खातरजमा केली असता ते दागिने बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर बॅंकेचे मॅनेजर सागर आप्पासो भोसले (वय ३०, रा. दहिवडी, ता. माण) यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सराफासह चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणातील कोणालाही अटक झाली नव्हती. पोलिस उपनिरीक्षक जी. एस. दोलताडे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँकsatara-acसातारा