शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

नोकरीच्या आमिषाने पन्नास लाखांचा गंडा

By admin | Updated: October 15, 2016 01:08 IST

कऱ्हाडात दोघांना अटक : चार विद्यार्थ्यांना फसविले; सातारा, पुणे, मुंबईतही फसवणूक

कऱ्हाड : राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकांना बनावट नियुक्तीपत्रे देत सुमारे पन्नास लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत चार युवकांनी तक्रार दिली असून, प्रथमदर्शनी चौदा लाखांची फसवणूक निष्पन्न झाली आहे. कऱ्हाडप्रमाणेच सातारा, पुणे, कोरेगाव, मुंबई या ठिकाणीही आपण युवकांकडून पैसे घेतल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे फसवणुकीतील रकमेचा आकडा पन्नास लाखांपर्यंत जाण्याची चिन्हे आहेत. अनिल बाबूराव देवकर (रा. किरपे, ता. कऱ्हाड) व सुरेश मोतिलाल पल्लोर (रा. रामकुंड, सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांनाही कऱ्हाड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बँक आॅफ इंडियामधील नियुक्तीची बनावट कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या शंकर आत्माराम पाटील यांचा मुलगा प्रसाद हा वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षात शिकतो. प्रसादला त्याच्याच वर्गातील मुलाने बँक आॅफ इंडियात भरती सुरू असल्याचे सांगितले. तसेच माझ्या वडिलांची बँकेत ओळख असल्याचेही तो म्हणाला. ही माहिती मिळाल्यानंतर शंकर पाटील यांनी किरपेतील अनिल देवकर याची भेट घेतली. त्यावेळी देवकरने साताऱ्यातील सुरेश पल्लोरची बँकेत ओळख असल्याचे व तो पैसे घेऊन बँकेत नोकरी लावत असल्याचे सांगितले. त्याचवेळी किरपे येथील संभाजी देवकर, विमानतळ-मुंढे येथील देवेश निकम व कोयना वसाहत येथील राजेश साळुंखे हे त्यांच्या मुलाला नोकरी लावण्यासाठी देवकरकडे आले होते. १५ मे २०१६ रोजी सुरेश पल्लोर विजयनगर येथे येणार असल्याचे सांगून त्यावेळी त्याच्याशी सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन देवकरने दिले. विजयनगर येथे १५ मे २०१६ रोजी सुरेश पल्लोरची या सर्वांशी भेट झाली. त्यावेळी मुलांच्या मेडिकल तपासणीसाठी प्रत्येकी ६ हजार रुपये असे एकूण २४ हजार रुपये त्याने घेतले. तसेच ३० मे २०१६ रोजी सर्वांची नियुक्तीपत्र देतो, असेही त्याने सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार ३० मे रोजी पुन्हा सर्वजण सुरेश पल्लोर व अनिल देवकर या दोघांना भेटले. त्या दोघांनी चौघांच्या मुलांना सीलबंद पाकिटातील नियुक्तीपत्र दिली. संबंधित नियुक्तीपत्रावर बँक आॅफ इंडियाचा शिक्का होता. त्यामुळे ती खरी असल्याचे समजून चौघांनीही प्रत्येकी साडेतीन लाख असे एकूण १४ लाख रुपये अनिल देवकर व सुरेश पल्लोर यांना दिले. २३ जून २०१६ रोजी चारही मुलांना सातारा येथे बँकेत हजर करून घेणार असल्याचे त्यावेळी पल्लोरने सांगितले होते. मात्र, नियुक्तीची तारीख होऊन गेली तरी मुलांना बोलावणे न आल्याने पालक अस्वस्थ झाले. त्यांनी देवकर व पल्लोर यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकांनी त्या दोघांकडे पैसे परत मागितले. मात्र, ते त्यांनी दिले नाहीत. त्यामुळे गुरुवारी रात्री शंकर पाटील यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी अनिल देवकर व सुरेश पल्लोर या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून बँक आॅफ इंडियाची बनावट नियुक्तीपत्र हस्तगत करण्यात आली आहेत. सातारा, कोरेगाव, मुंबई व पुणे येथील काही युवकांकडून पैसे घेतले असल्याची कबुली पल्लोरने पोलिसांना दिली आहे. या दोघांनी पन्नास लाखांपर्यंत फसवणूक केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.