शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सातारा पालिकेकडून ४६६ कोटींचा अर्थसंकल्प सादर, मिळकतदारांना घरपट्टीत सवलत देण्याचा निर्णय

By सचिन काकडे | Updated: February 28, 2023 16:05 IST

सातारा : भरीव विकासकामांचा समावेश असलेला ४६६ कोटी ३३ लाख ८४ हजार ३०० रुपयांचा अर्थसंकल्प सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत ...

सातारा : भरीव विकासकामांचा समावेश असलेला ४६६ कोटी ३३ लाख ८४ हजार ३०० रुपयांचा अर्थसंकल्प सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पात हद्दवाढ भागातील पायाभूत सेवांसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून, पर्यावरणपूरक इमारतीच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या मिळकतदारांना घरपट्टीत २० टक्के सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला.सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी  सकाळी प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गोडोली, विलासपूर, खेड, शाहूपुरी, दरे या भागांतील रस्ते, गटारे, उद्याने, वीज या पायाभूत सुविधांसाठी ५० कोटी, गोडोली तळे व कास धरणाच्या नवीन जलवाहिनीसाठी ५८ कोटींची तरतूद करण्यात आली.

ऊर्जा बचत, वृक्षारोपण, अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा पर्यावरणपूरक निकषांची पूर्तता करणाऱ्या मिळकतदारांना घरपट्टीत २० टक्के सवलत दिली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतसातारा पालिकेने १ हजार ९५८ घरांचा प्रकल्प हाती घेतला असून, बेघर व्यक्तींना सात लाख रुपयांत हक्काचे घर देण्यात येणार आहे.यंदाच्या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत ३ लाख ८८ हजार ३०० रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली आहे. महसुली जमा खर्च आणि भांडवली जमा खर्च यांचा ताळमेळ बसवताना प्रशासनाला बरीच कसरत करावी लागली आहे. पालिकेच्या विकासकामांचा डोलारा शासकीय अनुदानावर उभा असून, यंदा देखील उत्पन्नवाढीच्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे अर्थसंकल्पात दिसून येत आहे.या सभेला मुख्य लेखापाल आरती नांगरे, मुख्य अभियंता दिलीप चिदे्र, लेखा परीक्षक कल्याणी भाटकर, लेखा विभाग लिपिक भालचंद्र डोंबे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. हा अर्थसंकल्प पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर