शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलांच्या थकबाकीचा ३९४ कोटींचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:25 IST

सातारा : गेल्या दोन महिन्यांत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ९ ...

सातारा : गेल्या दोन महिन्यांत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ९ लाख ९० हजार वीज ग्राहकांनी वीजबिलांचे तब्बल ३९४ कोटी २२ लाख रुपये थकविले आहेत. त्यामुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली असून, थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

सद्यस्थितीत या वर्गवारीतील २८ लाख ५५ हजार ग्राहकांकडे १ हजार ३५९ कोटी ४ लाखांची थकबाकी झाली आहे. पुणे प्रादेशिक विभागात मार्चअखेर लघुदाब वर्गवारीच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १८ लाख ६५ हजार ५० ग्राहकांकडे ९६४ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी होती. मात्र एप्रिल व मे महिन्यांत वीजबिलांचा भरणा न झाल्यामुळे सद्यस्थितीत २८ लाख ५५ हजार वीजग्राहकांकडे ही थकबाकी १ हजार ३५९ कोटी ४ लाखांवर गेली आहे. या दोन महिन्यांत सर्वाधिक ८ लाख ६ हजार ८६६ घरगुती ग्राहकांकडे २१० कोटी ३१ लाख, १ लाख ६० हजार ४५० वाणिज्यिक ग्राहकांकडे ११७ कोटी तसेच २२ हजार ८२४ औद्योगिक ग्राहकांकडे ६६ कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी वाढली आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या व तौक्ते चक्रीवादळाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणचे वीजयोद्धे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र व अविश्रांत राबले आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने महावितरणची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. मात्र वर्षभरापासून वीजबिलांचा व थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे.

चौकट :

सद्यस्थितीत लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक)

जिल्हा ग्राहक थकबाकी

पुणे जिल्हा : १२ लाख ९७ हजार २२५ ग्राहक: ७३५ कोटी ९५ लाख,

सातारा जिल्हा : ३ लाख १६ हजार ८२० ग्राहक : ७७ कोटी ७३ लाख,

सोलापूर जिल्हा ४ लाख ३५ हजार २१० ग्राहक : १८८ कोटी ४८ लाख,

सांगली जिल्हा ३ लाख २१ हजार १५० ग्राहक : १२१ कोटी ४१ लाख

कोल्हापूर जिल्हा : ४ लाख ८४ हजार ७७० ग्राहक : २३५ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे.

................