शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

३८ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या केवळ २६!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी तीन वर्षांत ३८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २६ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश ...

सातारा : जिल्ह्यातून वेगवेगळ्या कारणांनी तीन वर्षांत ३८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी २६ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले तर १२ मुलींचा अद्यापही शोध सुरू आहे. कोरोना काळात अनेक निर्बंध आल्याने अल्पवयीन मुली घरातच लाॅक झाल्या. बाहेर फिरण्यावर बंधने आल्याने या वर्षी मुली बेपत्ता होण्याचा आकडा कमी आहे.

अल्पवयीन मुलगी हरविलेली किंवा पळवून नेलेली असली तर त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. बहुतांश प्रकरणांत महिला व मुली या त्यांच्या मर्जीनेच प्रियकरासोबत रफूचक्कर झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस दप्तरी मात्र, अशा प्रकरणात अपहरणाचा आकडा मोठा दिसतो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असते. दरम्यान, पालकांसोबत न गेलेल्या अल्पवयीन मुलींना शासकीय निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातून मुलींसोबतच ८९ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षांच्या आतील २९ मुलांचा समावेश आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत जिल्ह्यातून पलायन केलेल्या २४ मुलींपैकी १५ मुलींचा शोध लागला आहे. तर उर्वरित मुलींचा शोध घेण्यात येत आहे.

कोरोना व लाॅकडाऊन यामुळे मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण किंचित घटले आहे. कोरोनामुळे बाहेर जिल्हा व इतर राज्यांत तपासाला जायला अडचणी येऊ लागल्या. राज्य सोडून जायचे असेल तर त्यासाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी लागते. कोरोना काळात बस व रेल्वे सेवा बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही मुलींकडे मोबाइलच नसल्याने तपासाच्या दृष्टिकोनातून आणखी अडचणी निर्माण होऊ लागल्या

चाैकट : मुली चुकतात कुठे?

चांगले - वाईट ओळखा

वयाच्या १४ व्या वर्षापासून चांगले काय वाईट काय, याची समज मुलींना असते. सहकारी मैत्रीण यांची संगत कशी आहे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या घरातील वातावरण व बाहेरील वातावरण याचा परिणाम मुलींवर होतो. या वयात मुली मैत्रिणींचेच जास्त ऐकतात. कुटुंबीयांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

चाैकट : मोबाइल कमी वापरा

मुलींनी मोबाइलचा वापर कमी करावा. आई-वडील यांच्याशी पालक यापेक्षा मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. बाहेर जे काही घडत असेल ती प्रत्येक गोष्ट घरी सांगितली पाहिजे. नेमके हेच मुलींकडून होत नाही. बाहेर काही चुकीचे घडले असेल तर भीतीपोटी मुली घरी सांगत नाहीत. उलट सांगितले तर पुढची संकटे टाळता येतात.

चाैकट : हे आहे उदाहरण..

सातारा शहरातील एका प्रकरणात मुलीची ओळख पेठेतील मुलासोबत झाली. त्यातून मैत्री झाली. या मैत्रीतून बाहेर फिरणे सुरू झाले. मुलीच्या मनात किंचितही वाईट हेतू नव्हता. मुलाने दोघे एकत्र असल्याचे फोटो काढले. पुढे हेच फोटो दाखवून तो मुलीला ब्लॅकमेल करू लागला. एवढेच नव्हेतर, त्या मुलाने मुलीवर अत्याचारही केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. त्या वेळी हा प्रकार समाेर आला. ही घटना घडण्यापूर्वीच जर मुलीने घरातल्यांना हा प्रकार सांगितला असता तर हे संकट ओढवले नसते.

चाैकट : मुला-मुलीचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र

मुला-मुलींशी प्रत्येक पालकाने मैत्री करावी. प्रत्येक गोष्ट, सभोवताली घडणाऱ्या घटना, चांगले-वाईट हे त्यांना समजावून सांगावे. कोणताच संकोच मनात बाळगू नये.

अल्पवयीन मुला-मुलींना समज कमी असते. बाहेरील मित्र-मैत्रिणी यांच्याशी जास्त वेळ गप्पा होत असल्या तरी त्याबाबत त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एखाद्या मुलाचे - मुलीचे पाऊल चुकीचे पडत असेल तर लगेच लक्षात येते. त्याबाबत त्यांना प्रेमाने व मैत्रीच्या नात्याने समजावून सांगणे केव्हाही चांगले.

वयाच्या १५ वर्षांनंतर मुला - मुलीमध्ये बदल जाणवतो. मोबाइलचा अति वापर केव्हाही टाळला पाहिजे. मुलांना ते समजावून सांगावे. ऑनलाइन अभ्यासाव्यतिरिक्त मोबाइल हाताळू देऊ नये. मोबाइल जास्त वापरू नये. त्याची काही उदाहरणे देऊन मुलांना ते पटवून सांगितले पाहिजे.