शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३८ लाखाचे सोन्यासह हिऱ्याचे दागिने लंपास

By संजय पाटील | Updated: April 3, 2024 21:53 IST

कऱ्हाडातील घटना : खिडकीचे गज कापून चोरटे घुसले बंगल्यात

कऱ्हाड : बंगल्याच्या दरवाजानजीक असलेल्या खिडकीचे गज कापून आत घुसलेल्या चोरट्यांनी सोन्या-चांदीसह हिऱ्याचे तब्बल ३८ लाखाचे दागिने लंपास केले. कऱ्हाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळ शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटीत ही घटना घडली. याबाबत नरेंद्र वसंतराव जानुगडे यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमनजीक शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत नरेंद्र जानुगडे यांचा बंगला असून या बंगल्यात ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ३० मार्चपासून १ एप्रिलच्या रात्रीपर्यंत जानुगडे कुटुंबीय बंगळूर येथे कामानिमित्त गेले होते. बंगल्यातून बाहेर पडताना त्यांनी बंगल्याला कुलूप लावून सर्व दरवाजे, खिडक्या बंद केल्या होत्या. सोमवारी रात्री हे कुटुंबीय बंगळूरहून कऱ्हाडात आले. त्यावेळी बंगल्याचा दरवाजा कटविण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच दरवाजाशेजारी असलेली खिडकी उचकटण्यात आली होती. खिडकीचे दोन गज कापण्यात आले होते.

घरात चोरी झाल्याचा संशय आल्यामुळे कुटुंबीय तातडीने घरामध्ये गेले. त्यावेळी बेडरूमचा दरवाजा तोडलेला दिसला. तसेच बेडरूममधील वॉर्डरोबमध्ये असलेले सोन्याचे, हिºयाचे आणि चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे नरेंद्र जानुगडे यांच्या निदर्शनास आले. याबाबत जानुगडे यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक देवकर तपास करीत आहेत.

टॅग्स :satara-pcसाताराRobberyचोरी