शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावात अँटीजेन टेस्टमध्ये ३३ व्यावसायिक कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 10:46 IST

Coronavirus, hospital, sataranews दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहर व परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून कोरेगावात तीन टप्प्यांत घेण्यात आलेल्या ३१० अँटीजेन टेस्टमध्ये ३३ व्यावसायिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देकोरेगावात अँटीजेन टेस्टमध्ये ३३ व्यावसायिक कोरोनाबाधितबाधितांच्या आस्थापना सात दिवस बंद राहणार : नगरपंचायत घेणार कडक भूमिका

कोरेगाव : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहर व परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून कोरेगावात तीन टप्प्यांत घेण्यात आलेल्या ३१० अँटीजेन टेस्टमध्ये ३३ व्यावसायिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

बाधितांचे प्रमाण हे ११ टक्के असून, नगरपंचायत प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे. बाधितांच्या आस्थापना शासकीय नियमानुसार बंद ठेवल्या जाणार आहेत. या संदर्भात मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सांगितले की, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाने पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी जिल्हाधिकारीशेखर सिंह व प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी शहरातील सर्वच व्यापारी व व्यावसायिकांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील हुतात्मा स्मारक येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तडवळे संमत कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने तीन टप्प्यांत टेस्ट करण्यात आल्या.

पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या १९९ टेस्टपैकी केवळ एकच जण बाधित आढळला होता, त्यानंतर पुन्हा करण्यात आलेल्या १११ टेस्टमध्ये ३३ जण बाधित आढळले आहेत. बाधितांचे प्रमाण हे ११ टक्के असून, बाधितांच्या आस्थापना शासकीय नियमानुसार सात दिवस बंद ठेवल्या जाणार आहेत. नगरपंचायत प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली असून, गुरुवारपासून कारवाई सुरू केली जाणार आहे.

ज्या दुकानांमध्ये मास्कचा वापर होत नाही, सामाजिक अंतर ठेवले जात नाही, अशांवर प्रथम प्राधान्याने कारवाई केली जाणार आहे. केवळ व्यवसायासाठी शहराला वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, त्यामध्ये कोणतीही हयगय होणार नसल्याचे घाडगे यांनी सांगितले.काळजी घेणे महत्त्वाचे कोरोना आता हद्दपारच झाला आहे, अशी शहरवासीयांची भावना तयार झाली आहे, अनेकजण लक्षणे असून देखील अंगावर दुखणे काढत आहेत, त्याचा फटका शहराला बसू लागला आहे. एकाचवेळी ३३ जण बाधित होणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे, सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. सारंग वाघमारे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर