शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीवर बसण्यासाठी ३२ हजारांची बोली

By admin | Updated: September 7, 2015 21:10 IST

कुंतीमाता उत्सव : उंब्रजच्या यात्रेत हजारो भाविकांची उपस्थिती

उंब्रज : ‘कुंतीमाता की जय, भीमसेन महाराज की जय’ या जयघोषात गुलालाच्या उधळणीत, बेंजोच्या दणक्यात, टाळ-मृदंगाच्या गजरात सोमवारी दुपारी कुंती मातेच्या मूर्तीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली.रितीरिवाजानुसार कुंतीमातेसह मूर्तीसह हत्तीवर बसण्याचा मान प्रमोद शाह यंना मिळाला. त्यांनी ३२,२५१ रुपये बोली बोलून मान मिळविला. कुंती मातेच्या मूर्तीसह हत्तीवर शाह विराजमान झाल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. कुंती मातेची मूर्ती तयार करण्यात आलेल्या महामुनी यांच्या घरापासून मिरवणूक सुरू झाली. भैरवनाथ मंदिर ते ग्रामपंचायत मार्ग मिरवणूक बाजारपेठेत आली. बाजारपेठेतून मिरवणूक शिवाजी चौकातून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून मारुती मंदिराजवळ गेली. तेथे मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली व परत मिरवणूक महामार्ग ओलांडून शिवाजी चौकातून बाजारपेठेत आली. तेथून मिरवणूक भीम मंडपात गेली.भीम मंडपाची भीमसेन महाराज यांची भव्य १० फुटी मूर्ती व गजराजावर आरुढ झालेली कुंती मातेशी मूर्ती या समोरासमोर आल्यानंतर भाविकांनी केलेला जयजयकार व भावनिक वातावरणात माता-पुत्रांची भेट झाली. ही भेट सूर्यास्ताच्या गोरज मुहूर्तावरच घडविली जाते. व अनोख्या उत्सवास सुरुवात झाली. (प्रतिनिधी)राजपुतांचा पारंपरिक मानयात्रेत बाळगोपाळाच्या खेळण्यासाठी उंच पाळण्यासह इतर पाळणे आणण्यात आले होते. तर विविध खेळण्यांची दुकाने, हॉटेल यामुळे बाजारपेठेत गर्दीच गर्दी दिसून येत होती. याच मिरवणुकीच्या दरम्यान, राजस्थानच्या राजपुतांची गेली चार पिढ्या स्थायिक झालेल्या हजारो कुटुंबीयांची ‘मान’ असलेल्या मायाक्कादेवीची मिरवणूक ही कृष्णा नदीवर स्थानासाठी जाते.