शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

कारंडवाडीच्या सोसायटीत २६ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:16 IST

कारंडवाडी, ता. सातारा येथील विकास सेवा सोसायटीमध्ये २६ लाख १३ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सचिव प्रदीप भगवान शिरतुरे (रा. अमरलक्ष्मी स्टॉपसमोर, संभाजी नगर, कोडोली सातारा) याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देकारंडवाडीच्या सोसायटीत २६ लाखांचा अपहारसचिवाला अटक : भरणा केलेल्या रकमेमध्ये अफरातफर

सातारा : कारंडवाडी, ता. सातारा येथील विकास सेवा सोसायटीमध्ये २६ लाख १३ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सचिव प्रदीप भगवान शिरतुरे (रा. अमरलक्ष्मी स्टॉपसमोर, संभाजी नगर, कोडोली सातारा) याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कारंडवाडी, ता. सातारा येथील विकास सेवा सोसायटीमध्ये प्रदीप शिरतुरे हा सचिव म्हणून काम पाहत होता. १८ जून २०१८ ते २९ मे २०१९ या कालावधीत त्याने आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे लेखापरीक्षणामध्ये निदर्शनास आले.कर्जदार, सभासदांनी भरणा केलेल्या रकमांच्या जमा पावत्या न काढणे, जमा रकमेचा व्यवहार किर्दीला न घेणे, जमा पावत्यांचा भरणा बँकांमध्ये न करणे, सचिव येणे खाती नावे दर्शवून त्याची पावती न काढणे अशाप्रकारे अफरातफर करून सचिव प्रदीप शिरतुरे याने २६ लाख १३ हजारांचा अपहार केल्याचे पुढे आले.अप्पर लेखा परीक्षक श्रेणी-१ राणी घायताडे (रा. सुषानगनर सोसायटी, कोरेगाव) यांनी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी शिरतुरे तत्काळ याला अटक केली.कोडोलीतून ५९ हजारांचा ऐवज लांबविलासातारा : येथील कोडोलीतील सन्मुख पिराप्पा होसमनी (वय ५६) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ५९ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी पेटी उचकटून सोन्याच्या दागिन्यांसह ५९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. होसमनी कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसर