सातारा: कोरोनावर मात केल्यानंतर अनेकजणांचे वाजन वाढल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्यात. पोस्ट कोविड सेंटरमधील आकडेवारीनुसार २६३ जणांचे वजन वाढल्याचे दिसून आले. गोळ्यांचा डोस आणि घरात तासन् तास विश्रांतीमुळे अनेकांचे वजन वाढले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना बाधित रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना गोळ्यांचा डोस सकाळ, संध्याकाळ देण्यात येत होता. तसेच पंधरा दिवस रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, घरी गेल्यानंतर काहींना त्रास जाणवू लागल्याने पुन्हा त्यांना पोस्ट कोविड सेंटरमधून उपचार घ्यावे लागले. अशा लोकांचे वजन वाढले असल्याचे दिसून आहे. काहीजणांचे ५० किलोवरून ५६ किलोकडे वजन झाले आहे. पाच ते सहा किलोने बऱ्याच जणांचे वजन वाढले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गोळ्यांचा डोसमध्ये स्टेरॉईड असते. त्यामुळेही वजन वाढण्याची दाट शक्यता असते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
चौकट : आधी ६० नंतर ६६ किलो झाले वजन
१) मी कोविड सेंटरमध्ये १८ दिवस उपचार घेतले. तेथे उपचार घेण्यापूर्वी माझे वजन बरोबर ६० होते. दोन महिन्यानंतर मी वजन पाहिले असता माझे वजन ६६ किलो झाले. गोळ्यांचा डोस सुरूच होताच. शिवाय घरात विश्रांती मिळाल्यामुळे वजन वाढले असावे, असे डॉक्टर सांगत असल्याचे एका कोरोना मुक्त झालेल्या युवकाने सांगितले.
२) कोरोना झाल्यामुळे सुरूवातीला भीती होती. आपली प्रतिकार शक्ती वाढावी, यासाठी फळे, भाज्यांचे भरपूर प्रमाणात सेवन केले. त्यामुळेचही कोरोनातून मुक्त झालेल्या नागरिकांचे वजन वाढल्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
३) वजन वाढू नये म्हणून काहींनी डोस बंद केले आहेत. तर काहीजण व्यायाम करू लागले आहेत. डॉक्टरांच्या सूचनेनुसार दैनंदिन काम ते करत आहेत. एकटे राहिल्यामुळे सतत झोपही घेत होतो. त्यामुळे वजन वाढले असल्याचे एकाने सांगितले.
४) एका युवकाचे दोन किलो वजन कोरोना मुक्तीनंतर वाढले होते. रोज व्यायाम करून त्याने वाढलेले वजन कमी केले. गोळ्यांचा दुष्परिणाम तर नाही ना? अशी शंकाही अनेकांनी घेतली होती. परंतु डॉक्टरांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले.
चौकट : स्टेराईड दिले जाते त्यामुळेही वजन वाढतेय
कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची औषधे दिली जातात. यामध्ये सर्वाधिक प्रतिकार शक्ती वाढविणारे औषध असते. व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि स्टेराईडच्या गोळ्याही असतात. त्यामुळे साहजिकच या गोळ्यांचा परिणाम होऊन वजन वाढले जाते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अनेकांनी खाण्यावर भर दिला. काहींना सतत भूक लागत होती. याचा परिणाम साहजिकच वजन वाढविण्यासाठी झाला. आपण नेहमी खातो, तेवढा आहार घेतला पाहिजे. तरच वजन कंट्रोलमध्ये येते.
कोरोनामुक्तीनंतर डॉक्टरांनी दिलेला सल्ला अनेकांनी चांगलाच मनावर घेतला. तुमची प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर चांगले खा..निरोगी राहाल. हा सल्ला मानून अनेकांनी भरपेट खाण्यासही सुरूवात केली. त्यामुळे वजन वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोट : कोरोना मुक्त झाल्यानंतर क्वचितच लोकांनी वजन वाढल्याच्या तक्रारी केल्या. परंतु त्यानंतर त्यांचे वजन पूर्वीसारखे झाले. प्रतिनियुक्त गोळ्या आणि चांगला आहार, विश्रांती यामुळेही सर्वसामान्य नागरिकांचेही वजन वाढते. या रुग्णांचेही वजन काही प्रमाणात वाढले.
डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा